Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी संभाजीनगरनंतर मुंबईतही राम नवमीला गालबोट; मालाड मालवणीत शोभायात्रेवर दगडफेक

संभाजीनगरनंतर मुंबईतही राम नवमीला गालबोट; मालाड मालवणीत शोभायात्रेवर दगडफेक

Subscribe

छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा भागात दोन गटात झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना गुरूवारी घडली. ही घटना ताजी असतानाच मुंबईतील मालवणी येथे रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ढोल-ताशे व लाऊड स्पीकर वाजवण्यावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली.

छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा भागात दोन गटात झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना गुरूवारी घडली. ही घटना ताजी असतानाच मुंबईतील मालवणी येथे रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ढोल-ताशे व लाऊड स्पीकर वाजवण्यावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली. राम नवमीनिमित्त मालाड मालवणी परिसरातील बजरंग दलाकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. (Lathi charge by police in Malad Malvani area of Mumbai during Ram Navami parade)

मिळालेल्या माहितीनुसार, शोभायात्रेत मालवणी गेट क्रमांक पाच जवळ दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना घडली. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला. तसेच, या दगडफेक आणि लाठीचार्जमध्ये 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे

- Advertisement -

मालाड मालवणी येथील शोभायात्रेदरम्यान काही लोकांनी दगड फेक आणि चप्पल फेक केल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केला आहे. सध्या मालवणी परिसरात तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, प्रकरण चिघळत असल्याचे पाहून सह पोलीस आयुक्त गुन्हेशाखा सत्यनारायण चौधरी यांनी मालवणीतील परिस्थितीचा आढावा घेतला. कोणत्याही परिस्थितीत वातावरण बिघडू नये यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. सध्यस्थितीत मालवणीतील प्रत्येक कानाकोपऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात आहेत.

- Advertisement -

दोन्ही गटातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात येत आहे. मशिदीजवळून मिरवणूक काढण्यात आली तेव्हा मशिदीत तारबीची नमाज अदा करण्यात येत होते. त्यावेळी मशिदीतील लोकांनी ढोल वाजवण्यास नकार दिला. काही लोकांनी ढोल वाजवणे बंद केले, मात्र तिवाना यांच्या सांगण्यावरून पुन्हा ढोल वाजवण्यास सुरुवात झाली, त्यानंतर मिरवणुकीवर दगडफेक सुरू झाली.


हेही वाचा – Sambhajinagar riots: पोलीस, अग्निशमन दल उशिरा का आलं? इम्तियाज जलील यांचा सरकारला सवाल

- Advertisment -