घरताज्या घडामोडीCorona: पुण्यात कोरोनाचा कहर कायम, एका रात्रीत २७५ रुग्णांची वाढ!

Corona: पुण्यात कोरोनाचा कहर कायम, एका रात्रीत २७५ रुग्णांची वाढ!

Subscribe

पुण्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे

पुण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पुण्यात एका रात्रीत २७५ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार ६०१वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ हजार १४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. शहरातल्या मुख्य रस्त्यांवर येणारे उपरस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच सध्या विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई देखील केली जात आहे.

सर्व पुण्यातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. २३ जुलैपर्यंत पुण्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला असून यादरम्यान वैद्यकीय स्टोअर्स, डेअरी, रुग्णालये आणि अत्यावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी दिली गेली आहे. सध्या मुंबईपेक्षा पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत आहे.

- Advertisement -

राज्यात काल ६ हजार ७४१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल दिवसभरात २३१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार ६६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच काल दिवसभरात ४ हजार ५०० कोरोना रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ४९ हजार ७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – औरंगाबादमध्ये ३९ नवे रूग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजारांच्या वर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -