घरमहाराष्ट्रनोव्हेंबरमध्ये मंत्री सत्ता स्थापनेत व्यस्त; राज्यात ३०० शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

नोव्हेंबरमध्ये मंत्री सत्ता स्थापनेत व्यस्त; राज्यात ३०० शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

Subscribe

नोव्हेंबरमहिन्यात एकीकडे सत्ता स्थापनेचा खेळ सुरू असताना दुसरीकडे मात्र ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवकाळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या चार वर्षातील एका महिन्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येचा सर्वाधिक आकडा आहे. २०१५ मध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं होतं. यावेळी अनेकदा आत्महत्येचा आकडा ३०० हून अधिक असायचा.

अवकाळी पावसामुळे राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तसंच अवकाळी पावसामुळे जवळपास ७० टक्के पिकांचं नुकसान झालं. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं लक्षात येतं. यापूर्वी २०१५मध्ये राज्यात ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण ६१ टक्क्यांनी वाढल्याचंही महसूल विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -

या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. मराठवाड्यात नोव्हेंबरमध्ये १२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापाठोपाठ विदर्भात ११२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात २०१९मध्ये एकूण २५३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर २०१८मध्ये हा आकडा २५१८ इतका होता. अवकाळी पावसामुळे राज्यातील एक कोटी लोकांना फटका बसला आहे. त्यात मराठवाड्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचा समावेश असल्याचं या आकडेवारीत नमूद केलं आहे.
एकीकडे अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसाना झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ६५५२ कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याचं प्रशासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -