मेटेंच्या मृत्यूनंतर ट्रामा केअर सेंटरचे भीषण वास्तव उघड, ४५ सेंटर्स ९ वर्षांपासून निष्क्रिय

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १९९७पासून आतापर्यंत १०८ ट्राँमा केअर सेंटर मंजूर केली. २०१३च्या बृहत आराखड्यानुसार ४२ नवीन ट्राँमा केअर सेंटर्सना मंजूरी देण्यात आली आहे. पण १०८पैकी ६३ सेंटर्सच कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबई : राज्यातल्या महामार्गांवर खास करून ‘मुंबई पुणे एक्स्प्रेस वे’वर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघातानंतर महामार्गावरील ट्राँमा केअर सेंटरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातल्या १०८ ट्रामा केअर सेंटरपैकी १५ सेंटरचे बांधकाम अपूर्ण तर ३० सेंटरचे आराखडेच तयार करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब विधानसभेत उघडकीस  उघडकीस आली आहे. राज्यातल्या महामार्गांवरील अपघातांचे वाढते प्रमाण आणि ट्रामा केअर सेंटरच्या संदर्भात विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नातील उत्तरांवरून राज्यातल्या ट्राँमा केअर सेंटरचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अँड. आशिष शेलार, अँड. पराग अळवणी व अन्य सदस्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १९९७पासून आतापर्यंत १०८ ट्राँमा केअर सेंटर मंजूर केली. २०१३च्या बृहत आराखड्यानुसार ४२ नवीन ट्राँमा केअर सेंटर्सना मंजूरी देण्यात आली आहे. पण १०८पैकी ६३ सेंटर्सच कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. उर्वरीत ४५ सेंटर्स मागील नऊ वर्षांपासून कार्यरत नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने लेखी उत्तरात मान्य केले आहे. यातील काही सेंटर्ससाठी जागाच उपलब्ध नाही. प्रत्येक ट्राँमा केअर सेंटरमध्ये दोन अस्थीव्यंगोपचार तज्ज्ञ, दोन भूलतज्ज्ञांसह ३३ पदांना मान्यता देण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर झाला आहे. पण त्यावर पुढे काही कार्यवाही झालेली दिसत नाही.

राज्यातील अपघातांची आकडेवारी
राज्यात २०२१मध्ये २९ हजार ४९४ रस्ते अपघात झाले. या अपघातात १३ हजार ५२८ प्रवाशांचा मृत्यु झाला २०२१मध्ये मुंबईत २ हजार २३० अपघात झाले. त्यात ३८७ प्रवाशांचा मृत्यु तर १ हजार ९४३ प्रवासी गंभीर जखमी झाले. २०२०च्या तुलनेत गेल्या वर्षी राज्यातील रस्ते अपघातात पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे.  महामार्गावरील अपघातात दररोज सरासरी ३७ ते ४० प्रवाशांचा मृत्यु होतो अशी प्राथमिक आकडेवारी आहे.

जिल्हा व अपघातांची संख्य

  • -पुणे- अपघाताची संख्या- १ हजार ३६३
  • -कोल्हापूर- अपघातांची संख्या-१ हजार ०३१
  • -नगर-१ हजार३६०
  • -सातारा- ८१२
  • ३०० ब्लँकस्पाँट

महामार्गावरील अपघातग्रस्त(ब्लँकस्पाँट) ठिकाणांची नोंद करण्यात येते. राज्यात प्रमुख महामार्गांवर सुमारे ३०० ब्लँकस्पाँट आहेत. त्यात मुंबई, कोल्हापूर, सातारा, नांदेड, नागपूर, नाशिक, सातारा, संभाजीनगर जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणांचा समावेश आहे.

  • मुंबई पुणे द्रूतगती महामार्गावरील अपघात

वर्षी. एकूण अपघात. मृत्यु.

-२०१८. ३५९.११४

-२०१९. ३५३.९२

-२०२०. १६१. ६६

-२०२१. २००.८८