जनरेटरच्या धुरात गुदमरून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

6 members of family died due to suffocation in generator smoke
जनरेटरच्या धुरात गुदमरून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

चंद्रपूरमधील दूर्गापुर भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरच्या धुरात गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे. घरातील वीज गेल्यानंतर जनेरेटर सुरु केले असता जनेरेटरच्या धुराने अवघं कुटुंब संपलं.

लष्कर कुटुंबाने रात्री वीज गेल्याने जनरेटर चालू केला होता. मात्र, जनरेटरच्या धुराने कुटुंबातील ७ सदस्यांपैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी शेजारच्या लोकांना शंका आल्यावर घटना उघडकीस आली. एक जण यात वाचला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. दुर्गापूर भागात वॉर्ड क्र. ३ मधील ही घटना असून मयत सर्व मजूर वर्गातील सदस्य आहेत.