घरताज्या घडामोडीकोरोनाला धूळ चारत ७४ वर्षीय पठ्ठ्याची आठ दिवसात कोरोनावर मात

कोरोनाला धूळ चारत ७४ वर्षीय पठ्ठ्याची आठ दिवसात कोरोनावर मात

Subscribe

अवघ्या आठ दिवसात पैलवान बडे ठणठणीत होऊन घरी परतले.

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा अद्याप कायम आहे. अनेक धट्ट्या कट्ट्या लोकांचाही कोरोनामुळे जीव जात आहे. पण कोरोनावर मात करणाऱ्या अनेक सकारात्मक बातम्याही ऐकत आहोत. अशीच एक घटना आहे बारामती जिल्ह्यातील माळेगाव येथील. देव तारी कोण मारी ही म्हण अगदी चपखळ बसली. मृत्यूच्या दारात असलेल्या एका ७४ वर्षांच्या पैलवानाने हसत हसत कोरोनावर विजय मिळवला आहे. दादासो बडे असे या पैलवानाचे नाव आहे. काह दिवसांपूर्वी पैलवान बडे यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात ते उपचार घेत होते. दरम्यान त्यांची प्रकृती ढासळली. त्याचा सीटी स्कोअरही १७.५०च्या खाली आला होता. मुख्य म्हणजे बडे यांची याआधी दोन वेळा बायपास झाली होती. त्यामुळे बडे या आजारातून बाहेर येतील की नाही अशी चिंता त्याच्या कुटुंबियांनी होती. मात्र आखाड्यात मल्लांना एका दमात गार करणाऱ्या बडे पैलावान यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनाला मजबूत धुळ चारली. अवघ्या आठ दिवसात पैलवान बडे ठणठणीत होऊन घरी परतले.

दादासो बडे हे माळेगावातील रांगडा पैलवान म्हणून ओळखले जातात. तरुण वयात कुस्त्याचे फड रंगवणारे बडे संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण गावाच दबदबा आहे. बडे हे आपल्या पत्नीसोबत माळेगावात दुग्धव्यवसाय करतात. भरपूर कष्ट करुन,संकटांचा सामना करत त्यांनी दुग्धव्यवसाय करुन आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. त्यांची दोन्ही मुले कामासाठी बाहेरगावी असतात.

- Advertisement -

बडे यांना कोरोनाची लागण होण्याआधी दोन वेळा बायपास करण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्यांना काही दिसांपूर्वी डेंग्यू देखिल झाला. सर्व आजारांवर मात करत ते बरे झाले होते. मात्र त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्याचबरोबर त्यांना न्यूमोनियाही झाला. बडे यांना उपचारांसाठी बारामतीच्या डॉ. गोकुळ काळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना आधी झालेल्या आजारांकडे बघता बडे आता कोरोनामधून बाहेर येतील यावर डॉक्टरही चिंतेत होते. त्यात बडे यांचा सिटी स्कोअरही १७.५० झाला होता. मात्र बडे यांचा आत्मविश्वास, आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ते आठ दिवसात कोरोनातून बरे झाले.

‘मी कोरोनाची भीती बाळगळी नाही. पैलवानकीचे शरीर आहे. मला काही होणार नाही असा विश्वास होता. योग्य आहार घेऊन जगण्याची इच्छाशक्ती व उर्जी होती त्यामुळे मी कोरोनाला हरवून जीवनाची कुस्ती जिंकली’, असे पैलवान बडे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – लोणावळ्यात आजपासून कडक Lockdown,विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -