घरमहाराष्ट्रमातोश्रीबाहेर झळकला भलामोठा बॅनर, उद्धव ठाकरेंनीच केली होती सूचना

मातोश्रीबाहेर झळकला भलामोठा बॅनर, उद्धव ठाकरेंनीच केली होती सूचना

Subscribe

बाळासाहेब ठाकरे जनसमुदायाला संबोधित करतानाचा एक फोटो या बॅनरवर दिसत असून मीनाताई ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटोही हा बॅनरवर लावण्यात आला आहे.

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी मातोश्रीबाहेर भला मोठा बॅनर (Big Banner outside Matoshree) लावण्यात आला आहे. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. या परिसरात बॅनरबाजीमुळे होणाऱ्या विद्रुपीकरणाला आळा घालण्यासाठी हा भलामोठा बॅनर लावला आहे.

हेही वाचा – ठाकरे-आंबेडकर एकत्र येण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी घेतली राजगृह निवासस्थानी भेट

- Advertisement -

मातोश्रीबाहेर शिवसेनेचे विविध नेते बॅनर लावत असतात. त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होत असतं. यामुळे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाकडून हा बॅनर लावण्यात आलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार हा बॅनर लावण्यात आला आहे.

हेही वाचा – वडिलांनी साथ सोडली असेल पण.., अमोल कीर्तिकरांचं मोठं वक्तव्य

- Advertisement -

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि चिन्ह मशाल देण्यात आले होते. या दोन्हींचा वापर या बॅनरवर करण्यात आला आहे. बॅनरच्या मध्यभागी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं मोठ्या अक्षरांत लिहिलं आहे तर, मशाल हे चिन्हीह या बॅनरवर दाखवण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे जनसमुदायाला संबोधित करतानाचा एक फोटो या बॅनरवर दिसत असून मीनाताई ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटोही हा बॅनरवर लावण्यात आला आहे.

हेही वाचा – निवडणूक चिन्हाबाबतची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळल्याने ठाकरे गटाला धक्का

निवडणूक आयोगाने याचिका फेटाळली

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटासाठी शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह गोठवले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे. तथापि, निवडणूक आयोगाला अंतिम निर्णय तातडीने घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -