घरमहाराष्ट्रआज महाराष्ट्रात क्रांतिकारक घोषणा होणार, ही फक्त सुरुवात; संजय राऊत असं का...

आज महाराष्ट्रात क्रांतिकारक घोषणा होणार, ही फक्त सुरुवात; संजय राऊत असं का म्हणाले?

Subscribe

मुंबई – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्रात आज क्रांतिकारक घोषणा होणार आहे, असा मोठा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी नायगाव येथे संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेत वंचित आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा करण्यात येणार आहे, असं राऊत म्हणाले. आज त्यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – बाळासाहेबांची जयंती, पक्षप्रमुखपदाचा शेवटचा दिवस; मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार?

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, आज महाराष्ट्रात क्रांतिकारक घोषणा होणार, याला लोकांना राजकारण म्हणायचं असेल तर म्हणून शकता. पण, वंचित बहुजन आघाडी-शिवसेनेच्या युतीची आज घोषणा होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आज एकत्र येणार आहेत. महाराष्ट्रात अजून खूप काही घडणार आहे, ही फक्त सुरुवात आहे, असं संजय राऊत म्हणाले.

ही दोन विचारांची युती आहे. बाळासाहेब ठाकरेंचं खूप जुनं स्वप्न होतं की अशाप्रकारे या दोन शक्ती एकत्र याव्यात. कोणाला वाटत असेल की आमच्या मागे महाशक्ती आहे. आंबेडकर यांच्या पाठिंब्याने आम्हाला महाशक्ती मिळणार आहे. यामुळे महाविकास आघाडी या युतीमुळे अधिक मजबूत होईल, असंही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – बाळासाहेबांच्या तैलचित्राचे आज अनावरण; मात्र उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत साशंकता

आजची रुपरेषा काय?

आज दुपारी १२.३० वाजता नायगाव येथे आंबेडकर यांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर, सायंकाळी पाच वाजता उद्धव ठाकरेंसह असंख्य शिवसैनिक रिगल सिनेमागृह येथे जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर, षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे शिवसैनिक, महाराष्ट्र आणि देशाला संबोधित करणार आहेत, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

जिथे जिथे मराठी माणूस पोहोचलाय त्या जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बाळासाहेबांना अभिवादन केलं जातं. मुंबईत मराठी माणसाला स्वाभिमानाने, ताठ मानेने जगता यावं याकरता आपल्या आयुष्यातील ५५ वर्षे बाळासाहेबांची झिजली. त्यांनी संघर्ष केला, राजकीय लढाया केल्या, तुरुंगवास भोगला, सत्तेशी युद्ध केलं. तेव्हा कुठे मुंबई मराठी माणसाची होऊ शकली. म्हणून आजही मुंबईवर मराठी माणसाचा पगजा आहे. लढत राहा, रडू नकोस, संकाटच्या छातीवर पाय ठेवून उभा राहा, असा मराठी माणसासाठी मंत्र होता. मराठी अस्मिता आपण जपतो ती त्यांची देणगी आहे. महाराष्ट्र आणि जगातील कानाकोपऱ्यातील मराठी माणूस हा बाळासाहेबांचा आजम्न ऋणी आणि कृतज्ञ राहिल, असंही संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना ही चार अक्षरं नसती तर महाराष्ट्राच्या राजकारणत गरम रक्ताची पिढी दिसतेय ती दिसली नसती. कोणतंही पाठबळ नसताना, राजकीय पाठबळ नसताना त्यांनी पक्ष उभा केला. असं नेतृत्त्व करणारा व्यक्त शतकातूनच जन्माला येतो, असंही राऊत पुढे म्हणाले.

हेही वाचा – विधानसभेतील तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम राजकीय; संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -