घरताज्या घडामोडीविधानसभेतील तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम राजकीय; संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

विधानसभेतील तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम राजकीय; संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Subscribe

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज, सोमवारी विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे, मात्र उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जाणार नसल्याची चर्चा आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांना विचारले असता हा एक राजकीय कार्यक्रम आहे.

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज, सोमवारी विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे, मात्र उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जाणार नसल्याची चर्चा आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांना विचारले असता हा एक राजकीय कार्यक्रम आहे. त्यावर न बोललेलेच बरे. जे स्वत:ला मोदींचे लोक म्हणतात, त्या मोदींच्या लोकांनी राजकीय स्वार्थासाठी या कायक्रमाचे आयोजन केले आहे, मात्र हा कार्यक्रम बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम असल्याने त्यावर टीका करणे योग्य नाही, असे संजय राऊत म्हणाले. (Oil Painting Unveiling Program in Legislative Assembly Political Sanjay Raut criticism of the Shinde Fadnavis government)

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सांगितले की, बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने शिवसेनेच्या सर्व शाखांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेत गटबाजी झालेली असली तरीही या दिवसांचे महत्त्व आणि शक्ती कमी होत नाही. सकाळी गेट वे ऑफ इंडिया येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आम्ही अभिवादन करणार आहोत. यानंतर, राज्यभरातील विविध कार्यक्रमांना सुरुवात होईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सायंकाळी षण्मुखानंद सभागृहात सभा घेतील. या सभेमार्फत ते शिवसैनिक आणि महाराष्ट्राशी संवाद साधतील.

- Advertisement -

संजय राऊत हे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत काश्मीरमध्ये सहभागी झाले होते. यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात बोलताना, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही बिगर राजकीय कार्यक्रम आहे. ते देशासाठी चालत आहेत, पण काही लोकांकडे फक्त टीका करायचे काम आहे. राहुल गांधी यांनी ४५०० किमीचा प्रवास केला. या टीका करणार्‍यांनी देशासाठी ४५० किमी चालून दाखवावे.

जे लोक अशी टीका करतात, ते स्वत: लाच टपल्या मारत बसतात. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. संपूर्ण देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा होते आहे. त्याची भीती त्यांना वाटते. राहुल गांधींची भारत जोडो यात्रेमागे देशहिताची भावना आहे, मात्र काही लोकांना केवळ टीका करण्याचं काम आहे, त्यांना ती टीका करू द्या, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -