घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीला धक्का! पवारांचे विश्वासू शिंदे गटात जाणार, मंगेश चिवटेंचा मोठा दावा

राष्ट्रवादीला धक्का! पवारांचे विश्वासू शिंदे गटात जाणार, मंगेश चिवटेंचा मोठा दावा

Subscribe

Mahesh Kothe | माजी महापौर महेशे कोठेदेखील पक्षापासून अलिप्त राहत आहेत. फार क्वचित ते बैठकांना हजर राहतात. त्यामुळे महेश कोठे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

सोलापूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांचे विश्वासू महेश कोठे (Mahesh Kothe) आता एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी हा गौप्यस्फोट आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून शिंदे गटात इनकमिंग सुरू झाले आहे. त्यातच, सोलापूरचे माजी महापौर हे शिंदे गटाचे आगामी आमदार असतील असा दावा मंगेश चिवटे यांनी केला आहे.

हेही वाचा – मेहक प्रभू, उमेश कोल्हेंचा उल्लेख करत शेलारांचा ठाकरेंवर निशाणा; म्हणाले मुंबईकर हो….

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. अजित पवारांसह अनेकजण राष्ट्रवादीच्या बैठकांना दांडी मारत असल्याने पक्षाला मरगळ आलेली आहे. माजी महापौर महेशे कोठेदेखील पक्षापासून अलिप्त राहत आहेत. फार क्वचित ते बैठकांना हजर राहतात. त्यामुळे महेश कोठे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चा सुरू असतानाच मंगेश चिवटे यांच्या एका वक्तव्याने त्यांच्या पक्षांतरावर शिक्कामोर्तबच झालं आहे.

माजी महापौर महेश अण्णा कोठे, बाळासाहेबांच्या शिवसेनेतील भावी आमदार आहेत. महेश अण्णा हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महेश कोठेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे, असं मंगेश चिवटे म्हणाले. मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे ते प्रमुख आहेत. रविवारी सायंकाळी लिंगायत समाजाच्या एका कार्यक्रमात चिवटे बोलत होते. यावेळी महेश कोठे आणि सुधीर खरटमलसह अनेक नेते उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – डायरीच नाही मग निविदा का काढली? आदेश बांदेकरांविरोधात मनसे आक्रमक

महेश कोठे कोण?

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाण्याच्या तयारी असलेले महेश कोठे हे मूळचे काँग्रेस पक्षाचे आहेत. सोलापुरात त्यांचं मोठं नाव आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तक, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या कोठेंनी शिवसेनेत राहूनच अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शिवसेनेच्या दिलीप माने यांच्याविरोधात लढत देऊन त्यांच्यापेक्षा जास्त मते मिळवली.

अखेर शिवसेनेतील घुसमट सहन न झाल्याने कोठेंनी शिवसेनेचे शिवबंधन तोडून महाविकास आघाडीच्या काळातच राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधले. शरद पवारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्यावर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी दिली होती. महाविकास आघाडीच्या काळात शरद पवार सोलापुरात गेले असता त्यांनी कोठेंच्या घरीही भेट दिली होती. त्यामुळे शरद पवारांचा हा विश्वासू नेता आता पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -