घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील - पर्यावरण मंत्री...

महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Subscribe

पुण्यात राज्यातील पहिल्या पर्यायी इंधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पर्यायी इंधन परिषदेचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी पर्यायी इंधनावर चालणाऱ्या प्रदर्शनाची देखील पाहणी केली आहे. त्याचप्रमाणे पुण्यात बनलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या इका इ ९ या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन देखील आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुणे हे मुख्य केंद्र असल्यामुळे इतर ठिकाणं सुद्धा त्यांना फॉलो करतील. पुण्यात व्हेहिकल लाँच होणं महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रीक गाडी आपण वापरू शकतो. पुण्यात ऑटोमेटेट हब राहिलेलं आहे. महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील. स्टार्टअप राज्यात खूप आहेत, आता त्यांना स्केल अप करायचे आहे. राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढला आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात देखील स्क्रॅपिंग पॉलिसी काही दिवसात राबवण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील असेही ठाकरे यांनी सांगितलं. या प्रदर्शनात पर्यायी इंधन विभागातील आघाडीच्या दुचाकी, तीन चाकी, कार आणि बसेस दाखवल्या जात आहेत. टाटा मोटर्स, पियाजिओ, स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन, महिंद्रा ग्रुप, कल्याणी ग्रुप, केपीआयटी आणि प्राज इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्यांनी प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : मराठी भाषेला पुसण्याचं काम कुणी केलं तर.., मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -