कार्यालयाजवळ गाडी लावली म्हणून आमदार दानवे संतापले, तरुणांना मारहाण करत…

या तरुणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. औरंगाबाद येथील अजबनगरच्या संपर्क कार्यालयाजवळ हा प्रकार घडला.

शिवसेना आमदार अंबादास दानवे (Shivsena MLA Ambadas Danave) यांनी काही तरुणांना शिवीगाळ केली आहे, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी तरुणांच्या वाहनांचे नुकसान केल्याचंही समोर आलं आहे. काही तरुणांनी कार्यालयाबाहेर दुचाकी उभी केली होती. त्यामुळे संतापलेल्या दानवे यांनी शिवीगाळ करत गाड्यांचे नुकसान केले. या तरुणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. औरंगाबाद येथील अजबनगरच्या संपर्क कार्यालयाजवळ हा प्रकार घडला. (Abusing young people, damage to vehicles; Complaint lodged against Shiv Sena MLA)

हेही वाचा – राज ठाकरे उद्यापासून मनसे पदाधिकारी – कार्यकर्त्यांना करणार ऑनलाईन मार्गदर्शन

तरुणांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अमित चावरीया, अतुल चावरिया, अनिकेत जावळे, रोहित हिवराळे, आदित्य गायकवाड हे मित्र एका हॉटेलमध्ये चहा पित होते. यावेळी त्यांनी आमदार अंबादास दानवे यांच्या अजबनगर येथील संपर्क कार्यालयाजवळ आपली दुचाकी पार्क केली.

कार्यालयाजवळच दुचाकी पार्क केल्याने अंबादास दानवे संतापले. दुचाकी लावून गेलेले तरुण हॉटेलच्या बाहेर येताच आमदार दानवे यांनी त्यांची बाईक खाली पाडली. तसेच, अंबादास यांचे पीए आणि इतर कार्यकर्त्यांनी गाड्यांचे नुकसान केले. त्यामुळे या तरुणांनी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा – स्थानिक निवडणुकांमध्ये २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार, जयंत पाटलांची माहिती