घरमहाराष्ट्रकणकवलीत हळवल फाट्यावर अपघात; चौघांचा मृत्यू, २३ जण जखमी

कणकवलीत हळवल फाट्यावर अपघात; चौघांचा मृत्यू, २३ जण जखमी

Subscribe

Accident In Kankavali | जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत.

Accident In Kankavali |सिंधुदुर्ग – कणकवली शहरालगत असणाऱ्या हळवल फाट्यावर आज गुरुवारी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणारी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी बस उलटली. यामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याने एकच हलकल्लोळ झाला. हळवल फाट्यावरील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ही लक्झरी उलटली.

अपघाताची माहिती मिळताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, डॉ. अभिजीत आपटे, पोलीस कर्मचारी किरण मेथे, यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी घेतली. अपघातातील काहींना कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयात तर उर्वरित जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींचे हात, पाय फ्रॅक्चर झाल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे. हे धोकादायक वळण वारंवार अपघातास निमंत्रण देत असून महामार्ग चौपदरीकरण कंपनी व महामार्ग अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कामामुळे या अपघातग्रस्त वळणावर सातत्याने गेले काही वर्षे अपघातांची मालिका सुरू आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

- Advertisement -

हेही वाचा रायगडमध्ये भीषण अपघात; नऊ जणांचा जागीच मृत्यू

जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

रायगडमध्येही भीषण अपघात

महाड येथील रेपोली गावाजवळ पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघतात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार वर्षांचा मुलगा जखमी झाल्याचे कळते. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माणगाव येथील रेपोली गावाजवळ ही घटना घडली. ट्रक व कारची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की गऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार वर्षांच्या मुलगा जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले.

कणकवलीत हळवल फाट्यावर अपघात; चौघांचा मृत्यू, २३ जण जखमी
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -