‘एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेसाठी खूप काही केले’, अभिनेता आरोह वेलणकरचं वक्तव्य चर्चेत

शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी बंड केले या सगळ्या प्रकारावरूनच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. आरोह वेलणकर याचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

विधानपरिषदेची निवडणूक(vidhan parishad election) झाल्यानंतर शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी बंड केले या सगळ्या प्रकारावरूनच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या सगळ्यावरच राजकीय वर्तुळातून विविध नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच मराठी चित्रपट सृष्टीमधूनही कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या किंवा मुलाखतीच्या माध्यमातून राज्यात सध्या जी काही राजकीय उलथापालथ होत आहे त्यावर भाष्य करत आहेत. मराठी अभिनेता आरोह वेलणकर(actor aroh welankar) याने सुद्धा या सगळ्यावर भाष्य केले आहे.

आणखी वाचा – एकनाथ शिंदेंच्या फोननंतर शिवतीर्थावर बैठक, नितीन सरदेसाईंसह अनेक नेते उपस्थित

आरोह वेलणकर हा एक उत्तम कलाकार आहेच पण त्या सोबतच आरोह वेलणकर(aroh welankar) सामाजिक कार्यातही नेहमी सक्रिय असतो. अभिनयासोबतच आरोहला सामाजिक कार्यातही रस आहे. सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय अस्थिरता झालेली आहे त्यावर भाष्य करत असताना अभिनेता आरोह वेलणकर नुकत्याच एका मुलाखतीमध्ये म्हणाला, की ‘शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना मोठं केलं असं वारंवार बोललं जात आहे. मग एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनीही शिवसेनेसाठी खूप काही केले आहे, याची जाणीव शिवसेनेला असायला हवी. आज ठाण्यात शिवसेना आहे ती केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे आहे. त्यामुळे त्यानींही शिवसेनेला भरभरून दिली आहे’. असं आरोह म्हणाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aroh Welankar (@arohwelankar)

आणखी वाचा – बंडखोर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू, दोन्ही बाजूंनी हायप्रोफाईल वकिलांची फौज तैनात

एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी बंडखोरी केल्या नंतर त्यांना अधिक आमदारांचं संख्याबळ आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा शिवसेनेकडे वळवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरु आहेत. पण एकनाथ शिंदे यांची बाजू अधिकच भक्कम होत चालली आहे. आता पर्यंत एकनाथ शिंदे यांच्या कडे ४० पेक्षा अधिक आमदारांचं पाठबळ आहे.
या सगळ्याच प्रकरणाबाबद प्रत्येक क्षणालाच नवीन माहिती समोर येत आहे. त्यातच अभिनेता आरोह वेलणकर(aroh welankar) याने सुद्धा त्याच मत व्यक्त केलं आहे. आरोह वेलणकर याचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.