घरताज्या घडामोडीसमर्पित भावनेने, एकाग्रतेने काम करा आणि समाधान मिळवा : अतिरिक्त आयुक्त सुरेश...

समर्पित भावनेने, एकाग्रतेने काम करा आणि समाधान मिळवा : अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी

Subscribe

आपले काम हे समर्पित भावनेने, एकाग्रतेने आणि मनापासून करा. त्यामुळे अशा कामातून तुम्हाला अधिकाधिक समाधान मिळेल. तसेच आपल्या जीवनातील काही प्रसंगांमधूनही छोटे-छोटे आनंद देखील आवर्जून मिळवा, असा जीवन उपयोगी संदेश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिला सायन रूग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदींना दिला आहे. ते सायन रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.

याप्रसंगी, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) ६ संजय कु-हाडे, उपायुक्त (घन कचरा व्यवस्थापन) डॉ. संगीता हसनाळे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. नीलम आंद्रादे, सायन रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कल्पना मेहता, केईएम रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे यांच्यासह रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

अवयव प्रत्यारोपण आणि पोटाच्या विकारांंशी संबंधित शस्त्रक्रियागृहांचे लोकार्पण

यावेळी, सायन रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अवयव प्रत्यारोपण व पोटाच्या विकारांंशी संबंधित शस्त्रक्रियागृहांचे आणि वैद्यकीय सभागृहाचे लोकार्पणही अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमातील पहिल्या सत्रादरम्यान सुप्रसिद्ध ओबेसिटी सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांनी लठ्ठपणा विषयक व्यवस्थापन आणि बॅरिॲट्रिक सर्जरी याबद्दल सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणासह उपस्थितांना दिली. तसेच, त्यानंतर डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी बदलत्या जीवनशैलीमध्ये आहाराचे महत्त्व आणि मधुमेहासारख्या आजारावर मात करण्यासाठी आहारात, आहाराच्या प्रमाणात आणि आहाराच्या वेळेत कोणते बदल करावेत याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन उपस्थितांना केले.


हेही वाचा : …पण तुम्ही गधादारी नक्कीच आहात, हिंदुत्व वादावरून फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -