घरमहाराष्ट्रखुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कर्नाटकात भाजपच्या प्रचाराला; आदित्य ठाकरेंचा आरोप

खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कर्नाटकात भाजपच्या प्रचाराला; आदित्य ठाकरेंचा आरोप

Subscribe

मुंबईः स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचाराला गेले आहेत, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

वरळी येथील कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला. पुणे, मुंबई आणि बारसू येथे आंदोलन सुरु आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांना बोलायला वेळ नाही. त्यांना त्यांच्या खुर्चीची चिंता आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी शिंदे भाजपचा प्रचार करायला कर्नाटक येथे गेले आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

वज्रमुठ सभा आता होणार नाही, असा दावा केला जात आहे, या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, वज्रमुठ सभेचा सत्ताधाऱ्यांनी धसका घेतला आहे. खारघर येथे ऊन्हामुळे जी घटना घडली. त्यामुळे आम्ही वज्रमठ सभा पुढे ढकलल्या आहेत. खारघर येथील घटनेचे खापर श्रींवर त्यांनी फोडले. कोणाला त्रास होऊ नये यासाठी आम्ही सभा पुढे ढकलल्या आहेत.

बारसू येथे रिफायनरी व्हावी. मात्र स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प करावा, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. महाराष्ट्राबाहेर गेलेले प्रकल्प पुन्हा राज्यात आणावेत. गुजरातला रिफायनरी द्यावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार राज्य शासनाने निर्णय घ्यावा, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

संजय राऊत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार आहेत,असा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, आज हास्य दिन आहे. असं असलं तरी त्यांंच वक्तव्य मनावर घेऊ नका.

मातोश्री नावाने मुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्य शिबीर सुरु केलं आहे. त्यांच्याकडे स्वतःच असं काही नाही. चोराचोरी करुनच ते राजकारण करत आहेत. मणिपूर येथील हिंसाचार चिंताजनक आहे. आपले अनेक विद्यार्थी तेथे अडकले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना त्याची चिंता नाही. ते भाजपच्या प्रचारात आहेत. ते विद्यार्थ्यांना चार्टड विमानाने आणू शकतात. कारण त्यांना पळवापळवीची सवय आहे. गुवाहटीला त्यांनी आमदार कसे पळवून नेले होते. तसे ते विद्यार्थ्यांना आणू शकतात, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -