घरमहाराष्ट्र"आता सत्ता गेल्यानंतर ठाकरेंना उपरती सुचली का?" सुधीर मुनगंटीवारांचा सवाल

“आता सत्ता गेल्यानंतर ठाकरेंना उपरती सुचली का?” सुधीर मुनगंटीवारांचा सवाल

Subscribe

"मला दुसऱ्यांनी बारसूची जागा सांगितली. यानंतर मी बारसूची जागा सुचविली. मुख्यमंत्री पदावर असताना जे नेते स्वता:च्या मर्जीने काम करू शकत नाहीत. त्या नेत्यांनी राज्याचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करू नये", असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

मुंबई | “आता सत्ता गेल्यानंतर ठाकरेंना उपरती सुचली का?”, असा सवाल कॅबिनटे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. “बारसूमधील लोकांना मधाचे बोट लावून सोन्यासारख्या जमिनी घेतल्या. प्रकल्प येणार हे तुम्हाला माहित होते. आता हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाडच्या सभेतूत भाजपवर केली. यावर सुधीर मुनगंटीवारांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या बारसू रिफायनरीच्या (Barsu Refinery) भूमिकेवर सवाल उपस्थितीत करत त्यांच्यावर निशाणा साधला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “नाणारच्या ऐवजी आपण दुसरीकडे जागा देऊ, असे म्हणत उद्धव ठाकरेंनीच बारसूची जागा सूचविली. यासाठी त्यांनी केंद्र सरकारला पत्र देखील पाठविले. या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प व्हावा, आणि आता सत्ता गेल्यानंतर ठाकरेंना उपरती सुचली का?”, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे आता म्हणतात की, मला दुसऱ्यांनी बारसूची जागा सांगितली. यामुळेच मी बारसूची जागा सुचविली. मुख्यमंत्री पदावर असताना जे नेते स्वता:च्या मर्जीने काम करू शकत नाहीत. त्या नेत्यांनी राज्याचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करू नये”, असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisement -

बारसूसंदर्भात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी

सध्याच्या सत्ताधारला विकासाचे श्रेय मिळू नये म्हणून उद्धव ठाकरे, असे करत आहेत का? असा सवाल पत्रकारांनी सुधीर मुनगंटीवार यांना विचारल्यावर ते म्हणाले, “होऊ शकते, बारसूसंदर्भात तुमच्याकडे रिसर्ज असेल, तर तुम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यावी आणि यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी. यादरम्यान उद्धव ठाकरेंनी त्याचे सर्व मुद्दे मांडावावे. या आधारे बारसूमधील रिफायनरीला विरोध करत आहेत, असे त्यांनी सांगावे. परंतु, तुम्ही सभेत चर्चा करता. तुम्ही प्रशासकीय अधिकारी किंवा राज्याकर्त्यांची चर्चा करायला तयार नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत; बारसूप्रकरणी उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

उद्धव ठाकरेंनी सभेत नेमके काय म्हणाले

महाड येथील चांदे क्रिडांगणावर शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर सभे उद्धव ठाकरे म्हणाले, “आज मी बारसूत गेलेलो, त्या ठिकाणी माझे पत्र दाखवत होते. हो, मी पत्र दिले होते, मला खोटे बोलता येत नाही. खोटे बोलण्याची गरज नाही, कारण मी पाप केले नाही. यावेळी त्यांनी एक कागद दाखवताना म्हटले की, गद्दार उपऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन नाचतायत. यादीत उपऱ्यांची नावे आहेत. बारसू येथील लोकांना मधाचे बोट लावून सोन्यासारख्या जमिनी घेतल्या. प्रकल्प येणार हे तुम्हाला माहित होते. आता हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत,” असे वक्तव्य करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -