घरमहाराष्ट्रयोगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर; आदित्य ठाकरे म्हणतात, आपले सीएम-सुपर सीएम स्वतःसाठी...

योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर; आदित्य ठाकरे म्हणतात, आपले सीएम-सुपर सीएम स्वतःसाठी…

Subscribe

Aditya Thackeray | आपले सीएम आणि सुपर सीएम स्वतःसाठी दिल्लीत आणि गुवाहाटीला जातात. पण राज्यासाठी जात नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray | मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी राज्यातील विविध उद्योजकांची भेट घेतली आहे. यावरून युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. इतर राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन आपल्या उद्योजकांशी चर्चा करतात. पण आपले सीएम आणि सुपर सीएम स्वतःसाठी दिल्लीत आणि गुवाहाटीला जातात. मात्र, राज्यासाठी जात नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – ‘स्वराज्यरक्षक’ असा इतिहासात कुठेही उल्लेख नाही; ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची फेसबुक पोस्ट

- Advertisement -

आदित्य ठाकरे म्हणाले, योगी आदित्यनाथ मुंबईत आले, त्यांचं कौतुक करतो. गेल्यावर्षी शिवराज सिंह चौहान मुंबईत आले होते. मध्यंतरी अशोक गहलोत मुंबई दौऱ्यावर होते. आता आदित्यनाथ आले आहेत. मुंबईतील मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस, मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची ते भेट घेतात. आम्ही आमच्या काळात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणली. पण या सरकारने काय केलं? सीएम आणि सुपर सीएम स्वतःसाठी दिल्लीत गुवाहाटीला जातात, पण राज्यासाठी जात नाहीत. विविध राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात येतात. पण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री राज्यासाठी कुठेही जात नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. सीएम आणि सुपर सीएम दिल्लीत जाऊन स्वतःचे प्रश्न मांडतात. अजूनही यांचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मग हे राज्याचे प्रश्न कधी मांडणार, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा युपीत महाराष्ट्र भवन उभारणार; मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीत योगींचा होकार

- Advertisement -

देवेन भारती यांची स्पेशल पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की यात काहीही नवीन नाही. कारण राज्याला सीएम आणि सुपर सीएम आहेत.

सिनेटसह राज्यात महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुका व्हायला पाहिजेत. गद्दार सरकारमध्ये हिंमत असेल तर ते निवडणुका घेतील, असे आव्हानच त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा – युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज मुंबईत रोड शो, उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची घेणार भेट

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -