Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जय श्री राम! असली आ रहा है, नकली से सावधान, शिवसेनेची अयोध्येत...

जय श्री राम! असली आ रहा है, नकली से सावधान, शिवसेनेची अयोध्येत पोस्टरबाजी

Subscribe

राज्यात अयोध्या दौऱ्यावरुन मनसे आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हिंदुत्वाचा नारा दिलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ५ जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे देखील अयोध्या दौऱ्यावर आहेत. मात्र, दुसरीकडे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचाही दौरा समोर आला आहे. काकांच्या आधीच पुतण्या अयोध्येत रामाच्या दरबारी हजेरी लावणार आहेत.

आदित्य ठाकरे मे महिन्याच्या शेवटी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता आहे. जय श्री राम! असली आ रहा है, नकली से सावधान, अशी शिवसेनेकडून अयोध्येत पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेनं या पोस्टरच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच याची माहिती दिली होती.

- Advertisement -

प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. राम जन्मभूमीच्या लढ्यात शिवसेना पहिल्यापासून आहे. शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात अयोध्या दौरा करणार आहे. मात्र आमचा अयोध्या दौरा राजकीय नाही. आमचा दौरा श्रद्धेसाठी आहे, असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावला होता.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसेने जोरदार तयारी केली आहे. मनसेकडूनही अयोध्येत राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे पोस्टर लावण्यात आलं होतं. ‘राज’ तिलक की करो तैयारी आ रहे है भगवा धारी, चलो अयोध्या…’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं होतं. अयोध्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभागी व्हावं, यासाठी नियोजनात काटेकोरपणा आणला जात आहे. तसेच मनसेचं एक शिष्टमंडळ येत्या आठवड्यात अयोध्येसाठी रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.


- Advertisement -

हेही वाचा : …पण १४ तारखेला अनेकांचा मास्क काढणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -