Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'हे' घटनाबाह्य कृषिमंत्री, काय नाव त्यांचं?; आदित्य ठाकरेंचा सत्तारांवर हल्लाबोल

‘हे’ घटनाबाह्य कृषिमंत्री, काय नाव त्यांचं?; आदित्य ठाकरेंचा सत्तारांवर हल्लाबोल

Subscribe

शिंदे गटाचे नेते आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून मुंबईतील सत्तारांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्यात आले. मुंबईनंतर त्याचे पडसाद ठाण्यातही उमटले. दरम्यान, हे घटनाबाह्य कृषी मंत्री आहेत. काय नाव त्यांचं? काय नाव?, असा सवाल शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी करत अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

आदित्य ठाकरे हे अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी ते दुष्काळाची पाहणी करत असून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी सभा घेत अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार घेतला. हे घटनाबाह्य कृषी मंत्री आहेत. काय नाव त्यांचं? काय नाव?…अब्दुल गद्दारच. त्या मंत्र्याने सुप्रिया सुळेंसाठी वापरलेला शब्द अत्यंत घाणेरडा आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

मी केंद्राला विचारतो. असे लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवे आहेत का? अशी घाणेरडी लोकं जी महिलांना शिवीगाळ करतात, शेतकऱ्यांची खिल्ली उडवतात, तुम्ही दारू पिता का? असं जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात ते मंत्री म्हणून चालणार आहे का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा … महेश तपासेंचा इशारा

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशारा महेश तपासे यांनी दिला आहे.


हेही वाचा : २४ तासाच्या आत अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अन्यथा.., महेश तपासेंचा इशारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -