घरमहाराष्ट्रपुणेRamdas Athawale : महाविकास आघाडीनंतर महायुतीतही बिघाडी; रामदास आठवलेंनी दिला इशारा

Ramdas Athawale : महाविकास आघाडीनंतर महायुतीतही बिघाडी; रामदास आठवलेंनी दिला इशारा

Subscribe

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत एकला चलो रे चा नारा दिला. यानंतर आता महायुतीतही बिघाड असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय त्यांनी पुढील दोन ते तीन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. रिपाइं (आठवले गट) पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात आज पार पडली. यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना वक्तव्य केलं. (After Mahavikas Aghadi failure in Mahayuti too Ramdas Athawale warned)

हेही वाचा – Congress : राजकीय द्वेषातून रामटेकच्या काँग्रेस उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्द : नाना पटोले

- Advertisement -

रामदास आठवले म्हणाले की, आम्हाला लोकसभेच्या दोन जागा पाहिजे आहेत. शिर्डी आणि सोलापूरच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. त्याठिकाणी आमचा उमेदवार तयार होता. मात्र, भाजपाने त्याठिकाणी त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. परंतु सध्याची महायुती आरपीआयच्या पाठिंब्यामुळे झाली आहे. असे असतानाही रिप्लब्लिकन पक्षाकडे लक्ष दिलं जात नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. केंद्रात आणि राज्यात एक मंत्रीपद मिळेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलं नाही. महायुतीमध्ये असूनही आम्हाला राज्यात मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. आम्हाला सन्मान मिळावा ही अपेक्षा आहे.

आंध्र, तामिळनाडू, आसाम या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढत आहोत. आम्ही ज्यांच्या सोबत जातो, ते सत्तेत येतात. मी केंद्रात मंत्री असल्याने आमचा पक्ष देशभरात वाढला आहे. नागालँडमध्ये आमचे दोन आमदार निवडून आले आहेत. बैठकीत आमच्या पक्षाला दोन महामंडळ, एक विधानपरिषद सदस्य, विधानसभा निवडणुकीत 40 जागा आणि लोकसभेला दोन जागा हव्या आहेत. मात्र रिपब्लिकन पक्षाचा महायुतीत अपमान होत असेल तर वेगळा मार्ग धरावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Praniti Shinde : भिडायचं तर माझ्याशी भिडा, माझ्या वडिलांना का बोलता? प्रणिती शिंदेंचा सातपुतेंना सवाल

महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्यावर भाजपाची ‘बी’ टीम असल्याची टीका होत आहे. या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर जर ‘बी’ टीम असतील तर भाजपासोबत माझी ‘ए’ टीम आहे. ‘बी’ टीम वैगरे चर्चा होते. मतांची विभागणी होत असेल तर चर्चा होते. परंतु प्रकाश आंबेडकर भाजपाची ‘बी’ टीम अजिबात नाही. ते फक्त वंचित आघाडीचे नेते आहेत, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -