घरताज्या घडामोडीविरोधी पक्षनेता म्हणून राणेंसारखा दरारा मी कधीही पाहिला नाही, अजित पवारांकडून कौतुक

विरोधी पक्षनेता म्हणून राणेंसारखा दरारा मी कधीही पाहिला नाही, अजित पवारांकडून कौतुक

Subscribe

राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या शिंदे गट-भाजप सरकारने आज विधीमंडळ सभागृहात विश्वासदर्शक ठराव मंजूर केला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विधानसभेच्या सभागृहात भाषण करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं कौतुक केलं आहे.

राणेंसारखा दरारा मी कधीही पाहिला नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुद्धा विरोधी पक्षात काम केलं आहे. शिवसेनेत विरोधी पक्षात काम करताना नारायण राणेंचा दरारा जरा जास्तच होता. त्यांनी मागं जरी वळून पाहीलं तरी सगळे चिडीचूप व्हायचे. सगळेच जणं खाली बसायचे, त्यामुळे असला दरारा मी कधीच पाहिला नव्हता. शिवसेनेत अशा प्रकारचा दरारा मी दुसऱ्या कोणामध्ये कधीही बघितला नाही. परंतु राणेंनी त्यावेळी तो निर्माण केलेला होता, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

एकनाथ शिंदेंचा दरारा वेगळा होता

नारायण राणेंचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरारा वेगळा होता. कारण शिंदे सर्वांसोबत हसून-मिसळून खेळून त्यांच्यासोबत काम करायचे. परंतु या पदावर देखील काम करण्याची संधी आमच्या प्रांताध्यक्षांनी आणि इतर मान्यवरांनी करून दिली. तसेच सगळ्या सदस्यांनी उपलब्ध करून दिली. तसेच आजच तो विषय घेण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद करतो, असं अजित पवार म्हणाले.

आषाढी एकादशीच्या पूजेवरून उपमुख्यमंत्र्यांना टोला

आषाढी एकादशी जवळ आलेली आहे. त्यामुळे सर्वांना वाटत होतं की, आषाढी एकदाशीची पूजा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार की देवेंद्र फडणवीस करणार?, यावेळी फक्त दोघांचीच चर्चा सुरू होती. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही पूजा पार पडणार आहे. तसेच कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे, असा खोचक टोला पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अजितदादांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट – जयंत पाटील


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -