घरताज्या घडामोडीकोविड सेंटरसाठी ३१ मार्चपर्यंत SOP जाहीर होणार - सरकारचे आश्वासन

कोविड सेंटरसाठी ३१ मार्चपर्यंत SOP जाहीर होणार – सरकारचे आश्वासन

Subscribe

औरंगाबाद कोविड सेंटरमध्ये महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर विरोधकांनी आज गुरूवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या सुरूवातीलाच राज्य सरकारला धारेवर धरले. दहिसरच्या महिला आमदार मनिषा चौधरी यांनी राज्यात महिला सुरक्षित नाहीत असा प्रश्न औरंगाबादच्या घटनेच्या निमित्ताने कामकाजाच्या सुरूवातीलाच उपस्थित केला. त्यामुळेच महिलांच्या सुरक्षेचा विषय सरकारने गांभीर्याने घ्यावा अशीही विनंती त्यांनी सरकारला केली. यावर अजुन किती बलात्कार होणार आहेत ? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोविड सेंटरसाठी राज्यपातळीवर स्टॅण्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर (एसओपी) जाहीर करा या आशयाची चार पत्रे मुख्यमंत्र्यांना लिहिली आहेत. पण राज्य सरकारकडून याबाबतचे एकही उत्तर आले नाही असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे एसओपी लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी फडणवीस यांनी केली. सरकारने हा विषय गांभीर्याने घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी आदेश देण्याची मागणीदेखील त्यांच्याकडून करण्यात आली. सरकारकडून उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत एसओपी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. (Ajit Pawar assured strict action during maharashtra legislative assembly in aurangabad molestation case in covid center)

औरंगाबाद कोविड सेंटरमध्ये महिलेचा बलात्कार झालेला नसून विनयभंग झालेला आहे असे स्पष्टीकरण अजितदादा यांनी दिले. तसेच महिलेने आपले नाव जाहीर होऊ नये अशी मागणी केल्याचेही अजितदादा यांनी स्पष्टीकरण दिले. या प्रकरणातील आरोपी आणि महिलेचे पती हे मित्र आहेत. त्यामुळेच या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे अजितदादा यांनी सांगितले. पण या प्रकरणात डॉक्टरने केलेल्या कृत्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणात डॉक्टरवर कडक कारवाई करण्यात येईल. सध्या त्या डॉक्टरावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे अजितदादा यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद महापालिकेचा चौकशी अहवाल या प्रकरणात येणार आहे. तसेच महिलेने मांडलेले म्हणणेही सरकारकडे आले आहे असे अजितदादा यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?

औरंगाबादमध्ये एक धक्कादायक आणि लाजीरवाणी घटना घडली आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेकडे शरीरसुखाची मागणी चक्क डॉक्टराने केली असल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत कळताच संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टराला बेदम मारहाण केली. या प्रकरणाची चौकशी करावी आणि अहवाल सादर करावा, असा आदेश आता औरंगाबादचे आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिला आहे. पण आता या डॉक्टराची रुग्णालयातून हक्कालपट्टी केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी संध्याकाळी ही घटना औरंगाबादमधील पदमपुरा कोविड केअर सेंटरमध्ये घडली. संध्याकाळच्या वेळी या महिलेकडे डॉक्टरने शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर याबाबतची माहिती उपचार घेणाऱ्या महिलेने घरी कळवली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात शिरुन डॉक्टराला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -