घरताज्या घडामोडीराज ठाकरेंनी आतापर्यंत केलेली आंदोलन राज्याच्या नुकसानीची, भूमिकाही बदलल्या, अजित पवारांची टीका

राज ठाकरेंनी आतापर्यंत केलेली आंदोलन राज्याच्या नुकसानीची, भूमिकाही बदलल्या, अजित पवारांची टीका

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी परप्रांतीय, टोलनाका अशा भूमिका घेतल्या होत्या. यानंतर आता त्यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. त्यांच्या भूमिका या राज्यासाठी नुकसानीच्या राहिल्या आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या भूमिका नेहमीच बदलत राहिल्या आहेत. त्यांच्या भूमिका बदलाव्या लागल्या असल्याचेही अजित पवार म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेसंदर्भात टीका केली आहे. अजित पवार म्हणाले की, ज्यांनी हे भोंग्यांच्या संदर्भातील मुद्दा पुढे आणला, सगळीकडे माध्यमे नुसतं आता गाडीत बसले, गाडी निघाली, घरी पोहचले, घराचा दरवाजा उघडला हे काय चाललय, या व्यक्तीने मागे सांगितले होते टोल बंद करणार, आपल्याच पुणे मुंबईच्या टोल नाक्यावर गर्दी केली होती. पुढे काही झाले नाही. दोन की तीन दिवस आंदोलन केली. या व्यक्तीने आतापर्यंत जी जी आंदोलन केली ती राज्याच्या आणि समाजाच्या नुकसानीची होती. टोलच्या संदर्भात जर उद्या टोल बंद झाले तर हे सगळं देशामध्ये राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरु आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. हे टोल घेतल्यामुळे राज्यातील महामार्ग झाले आहे. टोल घेतले नाही तर समृद्धी महामार्ग झाले नसते. पुणे मुंबई महामार्गावर टोल घेतला म्हणून त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. छोट्या रस्त्यांचे टोल ठीक आहेत असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

यूपी बिहारबाबतची भूमिका फसली 

दुसरा मुद्दा युपी बिहार वाल्यांनो चले जाओ, सगळ्या शहरातील बांधकामे बंद पडली. बिल्डर्स म्हणाले आमच्याकडे काम करण्यासाठी मजूर राहिला नाही. ही लोक गेल्यानंतर सगळी काम थांबली, शेवटी ज्या व्यक्तीने यूपी बिहारच्या लोकांनी इथे काम करायचे नाही असे सांगितले त्यांना शेवटी पुन्हा आणावं लागले. यांना यांची भूमिका बदलावी लागली. यांनी भूमिका सोडली ना की ठेवली? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी फेरिवाल्यांना हटवा, काही जणांना मारतात, टॅक्सी वाल्यांना मारतात मग प्रसिद्धी मिळते. काही खर्च न करता प्रसिद्धी मिळतात. काही लोकांना करोडो रुपये खर्च करुन प्रसिद्धी मिळते. फेरीवाल्यांचा मुद्दा फेल गेला, यूपी बिहारच्या लोकांचा मुद्दा फेल गेला,

शेवटी सगळ्यांना कळालं हे आपल्याला परवडणारे नाही. आपली लोकं अशा प्रकारची काम करत नाहीत. हे सगळं उघड आहे. लोकांना कदाचित आवडणार नाही. परंतु ज्या ठिकाणी दुधाची डेअरी आहे. त्या ठिकाणी धारा काढण्यासाठी मशीन वापरण्यात येत आहे. कित्येक ठिकाणी धारा काढायला बाहेरचे लोकं आणतात आणि धार काढतात तेव्हा बाकीचे लोकं दूध पितात असे अजित पवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : कार्यकर्त्यांवर गुन्हे होतात पण नेते गॅलरीमधून इकडे तिकडे बघतात, अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -