घरमहाराष्ट्रलावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कार्यक्रमांच्या मुद्द्यावरून अजितदादा पदाधिकाऱ्यांवर संतापले

लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कार्यक्रमांच्या मुद्द्यावरून अजितदादा पदाधिकाऱ्यांवर संतापले

Subscribe

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यामुळे लावणीची व्याख्या बदलत चालली आहे. पण लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य करणाऱ्या गौतमी पाटील हिच्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली. पण यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे.

नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या लावणीच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या अश्लील नृत्यामुळे प्रकाशझोतात आली. तिला अनेकांकडून ट्रोल देखील करण्यात आले. तर अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमांना बंदी सुद्धा घालण्यात आली. पण आता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीमध्ये गौतमी पवार हिच्या कार्यक्रमांचा विषय निघाला तेव्हा अजित पवार चांगलेच संतापलेले दिसले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना देखील सुनावले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमात अशा कार्यक्रमांचे आयोजन न करण्याच्या सूचना देखील त्यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्वतः अजित पवार उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी अश्लील नृत्याच्या कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. त्यानंतर अजित पवार उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. तर वेळ पडल्यास हा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

- Advertisement -

त्यानंतर याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राची एक उच्च परंपरा आहे. आपल्या वडीलधाऱ्यांनी पहिल्यापासूनच एक परंपरा निर्माण केली आहे. ती परंपरा टिकली पाहिजे. त्यामुळे कोणी चुकीचे वागत असेल, तर त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी माझी आग्रही भूमिका आहे. असे अजित दादांकडून यावेळी सांगण्यात आले. तसेच लावणीचे सर्व कार्यक्रम सर्वानाच पाहता आले पाहिजे. त्यामुळे असे प्रकार व्हायला नकोत, असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा – मोदींचे पर्यावरणपूरक जॅकेट; संसदेत वेधले सर्वांचेच लक्ष

- Advertisement -

गौतमी पाटील हिचे काही महिन्यांपूर्वी अश्लील नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर मेघा घाडगे यांच्याकडून तिला समज देखील देण्यात आली होती. यावरून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांची माफी देखील मागितली होती. पण तरी देखील तिच्यामध्ये फारसा बदल दिसून आला नाही. त्यानंतर तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -