घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : सोलापूरच्या तुलनेत माढा जिंकणं भाजपसाठी कठीण; चंद्रकांत...

Lok Sabha Election 2024 : सोलापूरच्या तुलनेत माढा जिंकणं भाजपसाठी कठीण; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. विरोधी उमेदवाराचा पराभव करण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड प्रत्येक पक्षाने केली आहेत. अशात, काही लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत यंदा पाहायला मिळणार आहे.

सोलापूर : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. विरोधी उमेदवाराचा पराभव करण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड प्रत्येक पक्षाने केली आहेत. अशात, काही लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत यंदा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काही मतदारसंघात सत्ताधारी महायुती असो अथवा विरोधकांची महाविकास आघाडी यांना जिंकणं कठीण जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. (Lok Sabha Election 2024 Madha Lok Sabha Constitution Is Difficult to Win For BJP Says Chandrakant Patil)

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपसाठी सोलापूर जिंकणं थोड कठीण आहे. पण माढा जिंकणं जास्त कठीण आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील हे काल (17 मार्च) सोलापूर मतदारसंघात होते. त्यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा शहरात चंद्रकांत पाटील यांनी आमदार समाधान अवताडे आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यासह कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी मंगळवेढ्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर आणि माढ्याबाबत विधान केले. चंद्रकांत पाटलांच्या या विधानाने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : महाराष्ट्रात अजित पवारांना झटका?; महायुतीचे पारडे मात्र जड

सोलापूर लोकसभा मदारसंघात महायुतीने भाजपचे राम सातपूते यांना उमेदवारी जाहीर केले. तसेच, महाविकास आघाडीने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली. दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांची चांगलीच कोंडी केल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

शिवाय, माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आघाडी घेतली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये सहजासहजी विजय मिळवणे भाजपला शक्य नाही असे सर्व्हेही आले आहेत. माढ्यात विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देऊन भाजपने सर्वांची नाराजी ओढवून घेतली आहे.


हेही वाचा – LOK SABHA 2024 : हवा ही अशीच बनत असते, ठाकरे गटाचा मोदी यांच्यावर निशाणा

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -