घरमहाराष्ट्रमहाविकास आघाडी खातेवाटपावर अजित पवारांचा खुलासा

महाविकास आघाडी खातेवाटपावर अजित पवारांचा खुलासा

Subscribe

'आमच्या कुणाच्या कानावर खातेवाटपाबाबत कोणतीही बातमी आलेली नाही'

”आमच्यामध्ये थोडीशी नव्हे… तसूभरही चर्चा नाही. त्यामुळे तुमचे सोर्सेस काय आहेत ते मला कळू शकणार नाही”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार होता त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी सरकारमधील खातेवाटपाचा प्रश्न विचारला असता या बातम्या मिडियातील आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, खातेवाटप हा अधिकार तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा आहे. तिन्ही पक्षांचे नेते महाविकास आघाडी खाते वाटपाचा संपूर्ण निर्णय घेतील आणि हा निर्णय तिन्ही पक्षाला मान्य असेल असेही यावेळी अजित पवार म्हणाले. तसेच राज्यस्तरावर काम करणारे माझे सहकारी बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, जयंत पाटील, भुजबळसाहेब, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यापैकी आमच्या कुणाच्या कानावर खातेवाटपाबाबत कोणतीही बातमी आलेली नाही, असेही अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

- Advertisement -

तर आज गुरूवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर चार्टर्ड विमानातून खाली उतरण्याची नामुष्की ओढावली. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंड दौऱ्यासाठी निघाले असता राज्य सरकारकडून विमान उड्डाण करण्याची परवानगी मिळाली नसल्यामुळे प्रवास रद्द झाला. उत्तराखंड दौऱ्याचा भाग म्हणून राज्यपाल यांचे विमान देहरादून येथे उतरवण्यात येणार होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा शुक्रवारी त्याठिकाणी नियोजित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी ते निघाले होते. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सरकारी विमानात बसले होते. जवळपास १५ मिनिटांच्या कालावधीनंतर राज्यपाल विमानातून खाली उतरल्याने विरोधकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांनी देखील या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.

राज्यपाल या प्रकरणासंदर्भात दादांची प्रतिक्रिया

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. ठराविक दिवसांनी सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नाईलाजाने राज्यपालांना विमानातून उतरुन पुन्हा राजभवनावर जाण्याची वेळ आली. राज्यपालांना सरकारी विमान नाकरलं यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, ”राज्यपाल या प्रकरणासंदर्भात मला काहीही माहित नाही. मंत्रालयात गेल्यानंतर माहिती घेईन, त्यानंतर पुन्हा बोलेन.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -