मुख्यमंत्र्यांना विमानात जागा ठेवायला सांगितलंय, चिपी विमानतळावरुन अजित पवारांची टिपण्णी

पर्यटकांना आकर्षित करताना पर्यटन स्थळांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.

AJIt pawar speech at World Tourism day event on chipi airport

कोकणातील बहुप्रतिक्षित चिपी विमातळाचे उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. चिपी विमातनळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री जाणार आहेत. मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे मला देखील विमानात जागा ठेवा अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली आहे. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पात पर्यटनासाठी अधिक निधीची तरतुद केली असल्याचेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक निधीची गरज पडल्यास तात्काळ पुरवण्यात येईल असा शब्दही अजित पवार यांनी दिला आहे. चिपी विमानतळावर पुस्तकच लिहायला पाहिजे असेही अजित पवारांनी म्हटलं आहे.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली आहे. अजित पवार यांनी म्हटलं आहे की, सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं काम आता पुर्ण झालं आहे. या विमानतळावर पुस्तक लिहिले पाहिजे. किती टर्म काम चालु होते पण काही पुर्ण होईना. चिपी विमानतळावरील वाहतूक ९ तारखेला सुरु होत आहे. आम्ही पण मुख्यमंत्र्यांबरोबर जात आहोत. मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे मलाही जागा ठेवा असे विधान करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सर्वांगीण विकासासाठी पर्यटन’ हे घोषवाक्य सर्वार्थाने सार्थ ठरवणारी वाटचाल सुरू असल्याबद्दल पर्यटन विभागाचे कौतुक केले. राज्यात गड किल्ले, किनारपट्टी, साहसी पर्यटन, धार्मिक स्थळे, शैक्षणिक आणि वैद्यकीय पर्यटन अशा पर्यटनाच्या विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य वापर करून पर्यटकांना आकर्षित करताना पर्यटन स्थळांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत असलेल्या चिपी विमानतळाचा कोकणातील पर्यटनाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील पर्यटकांनी आधी महाराष्ट्र फिरावा, त्यानंतर इतरत्र जावे, असे आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.


हेही वाचा :  पर्यटक आपला ब्रँड एम्बेसेडर होईल अशा सुविधा करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सूचना