घरमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंवरील 'तो' हल्ला शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडूनचं; अंबादास दानवेंचा आरोप

आदित्य ठाकरेंवरील ‘तो’ हल्ला शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडूनचं; अंबादास दानवेंचा आरोप

Subscribe

महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) नेते आदित्य यांच्या ताफ्यावर दगडफेकीची घटना समोर आली आहेय. आदित्य ठाकरे पक्षाच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान औरंगाबादमधील वैजापूर भागात उपस्थित असताना त्यांच्या ताफ्यावर ही दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेवरून आता शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या गाडीवर झालेला तो हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

औरंगाबादमधील सभेच्या ठिकाणाहून निघालो तेव्हा आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली, यावेळी स्थानिक आमदार रमेश जानमारे यांच्या समर्थनार्थ लोकांनी जोरदार घोषणाबाजी केली, यावेळी जमावातील काही समाजकंठकांनी दोन गटात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisement -


दानवे पुढे म्हणाले की, भीमशक्ती – शिवशक्ती एकत्र येणार असल्याने काही लोक हे होऊन नये म्हणून जाणीवपूर्वक कारस्थान करत असल्याचा आरोपही दानवेंनी केला आहे. तसेच सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात असून सरकारने त्यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणीही दानवेंनी केली आहे.

औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीप्रकरणी विधान परिषदेचे सदस्य अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती दानवेंनी या पत्रातून केली आहे.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

शिवसेना आमदार आदित्य सध्या शिवसंवाद यात्रेनिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान काल आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काही अज्ञातांनी गोंधळ घातला, डीजे बंद केल्याच्या रागातून हा गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान महालगावमध्ये आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली. यावेळी रमाईंची मिरवणूक थांबत आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम सुरु ठेवू दिल्याने काही अज्ञातांनी किरकोळ दगडफेक केली. यावेळी मोठ्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. तर काहींनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीवर फेकल्याची माहितीही समोर आले आहे. यामुळे परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.


RBI चा सामान्यांना ‘जोर का झटका’, रेपो दरात वाढ, EMI वाढणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -