घरमहाराष्ट्रअतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी एक छदामसुद्धा ठेवला नाही; अंबादास दानवेंचे शिंदे सरकारवर टीकेचे बाण

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी एक छदामसुद्धा ठेवला नाही; अंबादास दानवेंचे शिंदे सरकारवर टीकेचे बाण

Subscribe

यशवंत जाधव आणि उदय सामंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी का करण्यात आली. आणि अतिवृष्टीग्रस्तांना अजूनही सरकार कडून मदत का मिळत नाही या संदर्भांतही बोलताना अंबादास दानवे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. 

राज्यात रोज नव नवीन घडामोडी सुद्धा घडत आहेत. पावसाळी अधिवेशनाचा(adhiveshan 20220 आजचा चौथा दिवस आहे. या पूर्वीही अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधान भवना बाहेरविरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध घोषणा देत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान आज सुद्धा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे(ambadas danve) यांनी विधान भवनात जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सुद्धा अंबादास दानवे यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत पुन्हा एकदा विरोधकांवर हल्ला बोल केला आहे. यशवंत जाधव(yashwant jadhav)आणि उदय सामंत(uday samant) यांची शिवसेनेतून हकालपट्टी का करण्यात आली. आणि अतिवृष्टीग्रस्तांना अजूनही सरकार कडून मदत का मिळत नाही या संदर्भांतही बोलताना अंबादास दानवे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.

हे ही वाचा – पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून अजित पवार आक्रमक; मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(cm eknath shinde) यांनी शिवसेनेत(shivsena) बंड केले. शिवसेनेचे राज्यातील काही महत्वाचे आमदार सुद्धा त्यांच्या सोबत शिंदे गटात गेले. त्यामुळे शिवसेना मात्र खिंडार पडले. दरम्यान विधान भवनात प्रवेश करण्यापूर्वी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, ” काही आमदार गेले म्हणून शिवसेना गेलेली नाही. शिवसेना आणि शिवसैनिक जागेवर आहे. त्याचबरोबर जनतेचा पाठिंबा सुद्धा शिवसेनेच्या मागे पूर्वीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शिवसेनाच सर्वांच्या नाका-तोंडात पाणी घालेल” असा खोचक टोला सुद्धा अंबादास दानवे यांनी विरोधकांना लगावला.

हे ही वाचा – पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत शिवसेनेतून उदय सामंत, यशवंत जाधवांची हकालपट्टी

- Advertisement -

उदय सामंत आणि मुंबई महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करत शिवसेनेतून या दोन्ही नेत्यानाची हकालपट्टी करण्यात आली. यावरही आमदास दानवे म्हणाले, ”हे स्वतःला शिवसेनेचे म्हणतात आणि शिवसेनेच्याच विरोधात वागतात. म्ह्णून ही हकालपट्टी झालेली आहे आणि या संदर्भांत शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भांत योग्य ती कारवाई करतील”. ”अतिवृष्टी ग्रस्तांना मदत मिळावी म्ह्णून आम्ही सभागृहात रोज त्या संदर्भांत मुद्दे मांडतो. पण या संदर्भांत मदत करण्यासाठी सरकारने एक छदाम सुद्धा ठेवलेला नाही, मग मदत कुठून करतील आणि हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे” असं म्हणत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिंदे – फडणवीस(shinde – fadanvis) सरकारवर निशाणा साधला.

हे ही वाचा – वाजपेयी, अडवाणींना विसरणारे बाळासाहेबांची स्वप्ने काय साकारणार?, सामनातून हल्लाबोल

आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे ”आज विधिमंडळात पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची उद्धव ठाकरे एकत्रित बैठक घेणार आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहेच पण उद्धव ठाकरेंनी(udhav thackeray) बैठक घेतल्या नंतर महाविकास आघाडीतील सर्व आमदारांमध्ये अधिक उत्साह येईल’ असा विश्वास सुद्धा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. दरम्यान काल  राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री(matoshtri) या त्यांच्या निवास स्थानी शिवसेनेतील काही महत्वाच्या नेते मंडळींची बैठक बोलावली होती. आजच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात नेमक्या कोणत्या घटना घडामोडी घडणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे ही वाचा – ठाकरे परिवार हेच तात्पुरत्या सत्ताधार्‍यांचे लक्ष्य

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -