शिवेसना खासदार संजय राऊतांना अमीषा पटेलने दिली ‘जादू की झप्पी’, व्हिडीओ व्हायरल

Amisha Patel hugs sanjay raut video goes viral
शिवेसना खासदार संजय राऊतांना अमीषा पटेलने दिली 'जादू की झप्पी', व्हिडीओ व्हायरल

शिवसेना खासदार संजय राऊत सामना मुखपत्रातून विरोधकांवर आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र डागत असतात. संजय राऊतांनी नेहमीच केंद्रीय मंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पाहिले आहे. प्रत्येक विषयावर ते आपलं परखड मत मांडताना दिसत असतात. परंतु अभिनेत्री अमीषा पटेल आणि संजय राऊत यांच्या गळाभेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमीषा पटेलनेसुद्धा आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन संजय राऊतांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत रविवारी झालेल्या कार्यक्रमात वेगळ्या अंदाजात दिसले. रविवारी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सलमान खान उपस्थित होता. अभिनेता रितेश देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. परंतु मुख्यमंत्री आणि सलमान खान येण्यापूर्वीच संजय राऊत दाखल झाले होते. थोड्या वेळाने अभिनेत्री अमीषा पटेलसुद्धा कार्यक्रम स्थळी दाखल झाली.

अभिनेत्री अमिषा पटेल कार्यक्रमाला आल्यानंतर संजय राऊत यांच्याशी भेट झाली. दोघांनी गळाभेट घेतली. याच गळाभेटीचा व्हिडीओ अमीषा पटेलने शेअर केला आहे. यापूर्वी संजय राऊत यांचा हार्मोनियम वाजवताना एक फोटो व्हायरल झाला होता. यानंतर मुलीच्या लग्नामध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.


हेही वाचा : आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र