घरमनोरंजन25 वर्षाच्या संसारानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केला पुनर्विवाह !

25 वर्षाच्या संसारानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केला पुनर्विवाह !

Subscribe

केदार आणि बेला शिंदे यांची मुलगी सना हिने सुद्धा विवाह सोहळ्या दरम्यान घडलेला सगळा थाट सोशल मीडियावर फोटो शेअर करत सांगितला.

दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा दुसर्‍यांदा लग्नबेडीत अडकले असल्याच्या जोरदार चर्चा सध्या मराठी चित्रपटसृष्टीत रंगत आहेत. केदार शिंदे यांच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. नुकतच केदार शिंदे यांनी लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त 9 मे रोजी दुसर्‍यांदा लग्नगाठ बांधली आहे. हा विवाह सोहळा मराठी इंडस्ट्रीतील काही खास लोकांच्या उपस्थितीत पार पडला. अंकुश चौधरी,शर्मन जोशी,भरत जाधव,सिद्धार्थ जाधव,आदेश आणि सूचित्रा बांदेकर  विवाह सोहळ्याला इत्यादि पाहुणे मंडळींनी हजेरी लावली होती.केदार आणि बेला शिंदे यांची मुलगी सना हिने सुद्धा विवाह सोहळ्या दरम्यान घडलेला सगळा थाट सोशल मीडियावर फोटो शेअर करत सांगितला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sana Kedar Shinde (@sanashinde)

- Advertisement -

तसेच विवाह सोहळ्याचे फोटो वसुंधरा साबळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहलं आहे की,”काल सकाळी आपापल्या घरी आम्ही केदारचे सर्व नातेवाईक आणि त्याची मीत्रमंडळी रविवार असुनही ११ वाजताचा मुहूर्त चुकू नये म्हणुन लवकर तयारी करुन बसलो होतो.लग्न सोहळा अगदी साग्रसंगीत सुरु झाला.जे केदार आणि बेलाच्या पहिल्या लग्नात दुरवर कुठेच नव्हते त्यांनी या लग्नातल यजमानपद अत्यंत उत्साहात उचललं होत.केदार कडून Prashant Gaonkar कुटूंबीय होते तर बेला कडून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर होते. सगळे विवाहवीधी अत्यंत गंभीरपणे सुरु झाले आणि सिध्दार्थ जाधव स्क्रीनवर दिसला तो त्याच्य ा घरातुन ओरडून सांगत होता ” सर मी तुमच्या लग्नात नाचणार आहे..” आणि तो लग्न लागताच खरच त्याच्या घरी नाचला सुध्दा. शर्मन जोशी सहकुटूंब सोहळा पाहात होता तो म्हणाला ” यार केदार हम एकबार शादी करके पछताते हैं तुमने दुसरीबार ये डेअरींग कैसे कीया? ” सोहळ्याच्या जागी लॉकडाऊनमुळे कुणी उपस्थीत नसले तरी सगळी धमाल तशीच चालू होती. पहिल्या लग्नात हिरीरीने भाग घेतलेले भरत,अंकुश आज नाईलाजाने घरात बसुन सोहळ्यात सामील झाले होते. बरेच लोक उत्साहाने शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यायला ऑनलाईन हजर होते. वाईट याच गोष्टीच वाटल की त्यावेळी बेला घरातुन पळून आल्यामुळे तीच्या कन्यादानाला मुकलेले तीचे कुटूंबीय या वेळीही लॉकडाऊनमुळे मुकलेच. ती जबाबदारी मात्र आदेश आणि सुचित्राने मोठ्या आनंदाने पार पाडली. लग्नपत्रीकेत ” स्नेहभोजन आपापल्या घरी ” अस लीहील्यामुळे मात्र लग्न लागताच आम्ही सगळेच आपापल्या घरी स्वयंपाकाला लागलो. अशा प्रकारे काल हा अनोखा विवाह सोहळा सुफळसंपुर्ण झाला.”


हे हि वाचा – ‘राधे’चित्रपटातील ‘झूम-झूम’ गाण्यात दिशा पटानी आणि सलमान खानचा जबरदस्त केमिस्ट्री धमाका !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -