घरमहाराष्ट्र"भाजपच्या काही फडतूस लोकांनी.." अमोल मिटकरींनी फडणवीसांना पुन्हा डिवचले

“भाजपच्या काही फडतूस लोकांनी..” अमोल मिटकरींनी फडणवीसांना पुन्हा डिवचले

Subscribe

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट केले आहे. मिटकरींनी त्यांच्या या ट्वीटमध्ये फडणवीसांना पुन्हा एकदा "फडतूस" म्हणून डिवचले आहे.

अजित पवार (Ajit pawar) यांनी त्यांचे कालचे (ता. ०७ मार्च) आणि आजचे (ता. ०८ मार्च) नियोजीत कार्यक्रम रद्द केल्याने राज्यातील राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले. अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्याने ते आत्ता कोणते नवीन वादळ आणतात, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण आज त्यांनी पुण्यात एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला सकाळीच हजेरी लावल्याने कालपासून होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. पण यावरून आता राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक ट्वीट केले आहे. मिटकरींनी त्यांच्या या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा “फडतूस” म्हणून डिवचले आहे.

“स्वप्नात मांडे मोडणाऱ्या भाजपच्या काही “फडतूस”लोकांनी त्यांच्या सोशल मीडियावरून अजितदादांचे कार्यक्रम रद्द झाल्याबरोबर रात्रभर आसुरी आनंद घेतला असला तर एक कबुल केले की दादा राज्याच्या राजकारणातील सर्वात शक्तीशाली नेते आहेत.दादांचे कार्यक्रम व्यवस्थित सुरु आहेत काळजी नसावी 😄😆” असे ट्वीट अमोल मिटकरी यांच्याकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या ट्वीटवरून आता पुढे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

तर, एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी फडणवीस हे एका वेळेस ३५ पुरणपोळ्या खातात, असे सांगितले होते. ज्यानंतर मिसेस फडणवीस यांच्या या वक्तव्याची बरेच दिवस चर्चा करण्यात आली. त्याच अर्थाने अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये स्वप्नात मांडे मोडणाऱ्या म्हणजेच स्वप्नात पुरणपोळी खाणाऱ्या असे लिहून फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

“फडतूस” आणि “काडतूस” शब्दावरून रंगला होता कलगीतुरा
ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर या दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटातील महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर संतापलेल्या उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर “फडतूस गृहमंत्री” अशी टीका केली. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत मी फडतूस नाही तर काडतूस आहे, झुकेगा नही घुसेगा असे असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते.


हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्यादौऱ्यावर संजय राऊतांचे टीकास्त्र, म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -