घरमहाराष्ट्रअनिल परब सातत्याने पोलिसांच्या होते संपर्कात, अटक करण्यासाठी दबाव?

अनिल परब सातत्याने पोलिसांच्या होते संपर्कात, अटक करण्यासाठी दबाव?

Subscribe

नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव होता का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी भाजप नेते ठिय्या मारून बसले होते. अटक वॉरंट दाखवा, तरच कारवाई करा, अटक वॉरंट असेल तरच आम्ही स्वत: गाडीत येऊन बसतो, असे भाजप नेते सांगत होते. तसेच पोलिसांवर राजकीय दबाव आहे, कारवाई करण्याचे आदेश येत आहेत, असेही भाजप नेते म्हणत होते. भाजपच्या या दाव्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ समोर आला आहे. अनिल परब यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पोलिसांचे फोन येत होते.

अनिल परब नेमके काय म्हणाले?
अनिल परब यांना पोलिसांचा फोन होता. त्यांचे बोलणे पत्रकार परिषदेतील माईकमध्ये रेकॉर्ड होत होते. मी सध्या रत्नागिरीत आहे. मी आता विचारुन घेतो सीएम साहेबांना. हो! फक्त मी ठरवतो, मग तसे आपल्याला ताबडतोब ब्रीफ करावे लागेल ना? हो हो हो… मग कोणाला सांगू ब्रीफ करायला? डीजींना सांगतो. मी डीजींना सांगतो. हो… ठिक आहे, मी आता डीजींना सांगतो ताबडतोब, ठिकाय मी आता ताबडतोब बोलतो.

- Advertisement -

त्या दरम्यान आमदार भास्कर जाधव हे मोबाईलमधील काहीतरी मेसेज अनिल परब यांना दाखवतात. भास्कर जाधव म्हणतात, कोर्टाने पण नकार दिलाय. त्यानंतर काही वेळाने अनिल परब फोन लावतात. हॅलो, काय करताय तुम्ही लोकं?? नाय पण ते करावंच लागेल तुम्हाला.. तुम्ही.. घेताय की नाही ताब्यामध्ये? हां…

ऑर्डर कसली मागतायेत ते? ऑर्डर कसली मागतायेत ते? अहो कोर्टाने जे काय आहे ते हायकोर्टात येणार नाही कॉन्फिडन्समध्ये… हायकोर्ट आणि सेशन कोर्ट दोघांनीही त्यांचा जामीन नाकारला आहे.

- Advertisement -

पण मग घ्या ना… पोलीस फोर्स वापरुन करा, अहो वेळ लागणार मग कोर्टबाजी चालूच आहे ना त्याची. ठिकाय.. ओके… फोन बंद झाल्यानंतर भास्कर जाधव अनिल परबांना म्हणतात, नारायण राणेला ताब्यात घेतलाय वाटतं.. मग अनिल परब भास्कर जाधवांना म्हणतात, घरात बसलाय, पोलिसांनी वेढा घातलाय, पोलीस आतमध्ये गेले तेव्हा धक्काबुक्की झाली. आता पोलीस ओढून बाहेर काढतायेत.. भास्कर जाधव म्हणतात.. चला आता (पत्रकार परिषद) संपवायला हवे. त्यादरम्यान पत्रकार अनिल परब यांना विचारतात, नारायण राणे यांना अटक झाली आहे का? त्यावर अनिल परब म्हणतात.. मला अजून त्याबाबतची माहिती मिळालेली नाही, त्यामुळे मी आता सांगू शकत नाही अटक झाली की नाही. मी इथे तुमच्यासमोर बसून आहे. मी तुम्हाला त्याबाबत काय सांगू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -