Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ७२ तासात लेखी माफी मागा अन्यथा १०० कोटींचा दावा दाखल करणार; अनिल...

७२ तासात लेखी माफी मागा अन्यथा १०० कोटींचा दावा दाखल करणार; अनिल परबांची सोमय्यांना नोटीस

Related Story

- Advertisement -

भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे. ७२ तासांच्या आत लेखी माफी मागण्याची मागणी केली आहे. तसंच, माफी मागितली नाही तर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा देखील अनिल परब यांनी सोमय्या यांना दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर दापोली येथे दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केला होता. तसंच, परिवहन खात्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. अनिल परब यांना वसुली मंत्री म्हटलं होतं. यावरुन आता अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. सोमय्या वैयक्तिक द्वेषभावनेतून असे आरोप करत असल्याचं अनिल परब यांनी नोटीसीद्वारे म्हटलं आहे. या नोटीसीमध्ये किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्यांचा आणि ट्विट्सचा संदर्भ देण्यात आला आहे.

- Advertisement -

माझ्यावर आरोप करुन माझी जनमाणसातील, पक्षातील प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे येत्या ७२ तासात लेखी माफीनामा हा कमीतकमी दोन इंग्रजी, हिंदी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करावा आणि तुमच्या ट्विटर हँडलवर ते ट्विट करुन पीन करुन ठेवावं, असं अनिल परब यांनी नोटीसीमध्ये म्हटलं आहे. तसंच, अनिल परब यांच्याविरोधात जे ट्विट करण्यात आले आहेत ते सर्व ट्विट हटवावे, असं अनिल परब यांनी वकिलामार्फत किरीट सोमय्या यांना सूचना केली आहे. याशिवाय, अनिल परब यांनी साई रिसॉर्टच्या बांधकामाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. या नोटीसीमध्ये वांद्रे येथील अनिल परब यांच्या कार्यालयाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर त्या ठिकाणी अनधिकृत कार्यालय बांधल्याचा आरोप केला होता. दरम्यान, सोमय्या या नोटीसीनंतर काय प्रतिक्रिया देतात हो पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

 

- Advertisement -