घरमहाराष्ट्रअँटिलिया प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिहांनी सायबर एक्सपर्टला दिली पाच लाखांची लाच

अँटिलिया प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिहांनी सायबर एक्सपर्टला दिली पाच लाखांची लाच

Subscribe

परमबीर सिंह यांची ‘जैश-उल-हिंद’चं नाव घुसवण्यासाठी सायबर तज्ज्ञाला ५ लाखांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अँटिलिया स्फोटक प्रकरणातील (Antilia Bomb Scare) अहवालात छेडछाड करण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी सायबर तज्ज्ञाला ५ लाख रुपये दिले, असा आरोप करण्यात आला आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-उल-हिंद (Jaish-Ul-Hind) संघटनेचं नाव अहवालात घुसवण्यासाठी परमबीर सिंह यांनी लाच दिली. यासंदर्भात एनआयएच्या आरोपपत्रात सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. एनआयएने अँटिलिया स्फोटक प्रकरणी १० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे.

जानेवारी महिन्यात दिल्लीतील इस्त्रायली दुतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला होता. याची जबाबदारी जैश-उल-हिंद संघटनेने घेतली होती. त्याचा फायदा घेत परमबीर सिंह यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरणात जैश-उल-हिंद संघटनेचं नाव घुसवण्यासाठी लाच दिली. एनआयएच्या आरोपपत्रात असा आरोप करण्यात आला आहे. एनआयएने सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवला असून यात त्याने परमबीर सिंग यांनी ज्या सायबर तज्ज्ञाकडून रिपोर्ट बनवून घेतला, तो सीपी मुंबई या ऑफिशियल मेल आयडीवर मी पाठवला, असं जबाबात म्हटलं आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणात एक मोठा कट असून आणखी काही संशयित असल्याचा दावा एनआयएने आरोपपत्रात केला आहे.

- Advertisement -

परमबीर सिंह यांनी या सायबर तज्ज्ञाला विश्वासात घेण्यासाठी हे ऑफिशियल आणि खूप कॉन्फिडेनशीयल काम असून यासंदर्भात मी एनआयएच्या आयजींशीही बोलणार आहे असं सांगितलं होतं. दिल्लीतल्या इस्राईल एम्बसीसमोर झालेला ब्लास्ट ज्या पद्धतीने दहशतवादी संघटनेशी जोडला गेला आणि त्याची पाळंमुळं तिहार जेलमध्ये सापडली त्यावरुनच असाच अहवाल तयार करण्यासाठी परमबीर यांनी सायबर तज्ज्ञाला सांगितल्याची माहिती आहे. यासाठी त्या तज्ज्ञाला परमबीर यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावलं होतं. तिथे त्याने बसून अहवाला छेडछाड केली, असं सायबर तज्ज्ञाने त्याच्या जबाबात म्हटलं आहे.

परमबीर सिंह यांच्याविरुद्ध ५० हजारांचे जामीनपात्र वॉरंट

दरम्यान, परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस अडचणी वाढत आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वसुलीच्या आरोपांची चौकशी करणार्‍या चांदीवाल आयोगाने वसुलीचा आरोप करणार्‍या परमबीर सिंह यांच्याविरोधात ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट सिंह यांना बजावण्यासाठी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी, असे आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक यांना आदेश दिले आहेत. परमबीर सिंह आयोगासमोर उपस्थित राहत नाही त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागत आहे. म्हणून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जावे, असे आयोगाचे वकील शिशिर हिरे म्हटले होते. यावर आयोगाने मंगळवारी ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  परमबीर सिंह यांच्याविरुद्ध ५० हजारांचे जामीनपात्र वॉरंट


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -