घर उत्तर महाराष्ट्र दिंडोरी : हजारो दिव्यांनी उजळला बाणगंगेचा काठ

दिंडोरी : हजारो दिव्यांनी उजळला बाणगंगेचा काठ

Subscribe

दिंडोरी : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जानोरी येथील पुरातन रामेश्वर महादेव मंदिर व बाणगंगा घाटावर हजारो दिवे प्रवज्वलीत करत दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच, बाणगंगेची आरती करण्यात आली.ग्रामपंचायतीच्या वतीने रामेश्वर मंदिर व गंगाघाटाची केरकचरा काढून पाण्याने स्वच्छता करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी शिवरुद्राभिषेकाने करण्यात आली. अभिषेकासाठी तापी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी, कर्‍हा, चंद्रभागा, सरस्वती या सप्तनद्या व अरबी समुद्राच्या जल आणण्यात आले होते. भाविकांनी हजारो दिव्यांची मांडणी केल्याने बाणगंगा घाट व मंदिर परिसर दीपज्योतींनी उजळून निघाला होता.

रामशेजच्या कुशीत जन्म घेणार्‍या बाणगंगेचे पूजन व गंगा आरती करण्यात आली. अभिषेक पूजेसाठी संस्थेचे पंडित मंगेश शास्त्री पाठक व नितीन देशमुख यांचे सहकार्य लाभले. दीपोत्सवानंतर फटाक्यांची आतषबाजी करत बालगोपाळांनी देवदीपावलीचा आनंद लुटला. त्यानंतर प्रसादाचे वाटप करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

- Advertisement -

कार्यक्रमाला ससरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनारवाडीचे उपसरपंच दत्तू भेरे, जऊळके दिंडोरीचे सरपंच तुकाराम जोंधळे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघ, संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब चव्हाणके, प्रवीण सोमवंशी, रामदास बुरकुल, नितीन ठाकरे, प्रवीण भेरे, अजय कापडणीस, अमोल घोलप, गणेश घोलप, संदीप कांदे, राजेंद्र काट्यारे, सजन फलाने, भरत ब्राह्मणे, आशिष घोलप, सचिन भामरे, महादेव खिल्लारे, पंकज ठाकरे, अमोल सोमवंशी, दिलीप सोनवणे, रोशन संधान, शांतिगिरी वाळुंज, केतकी सोमवंशी, वैष्णवी चव्हाणके, योगिता भेरे, चित्र ब्राह्मणे, हेमलता कट्यारे, पूनम ठक्कर, श्रावणी कांदे, सुयशा चव्हाणके, तनिष्का ब्राह्मणे, सोनाली होळकर, शीतल भालेकर, मोर्विका कापडणीस, अभिश्री सोमवंशी, श्रीमयी सोमवंशी व भाविक उपस्थित होते.

चांदवडच्या चंद्रेश्वरगडावर हरीहर भेट

चांदवड येथील श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे वैकुंठ दरवर्षाप्रमाणे यंदाही चतुर्दशी व हरिहर भेट उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीहरी विष्णू व भगवान महादेव यांच्या भेटीचे प्रतिक म्हणून महादेवाच्या पिंडीवर या दिवशी तुलसीदल अर्पण केले जातात. श्रीहरी विष्णूंच्या शालीग्रामवर बिल्वदल (बेल) अर्पण करत हरिहर भेट उत्सव साजरा करण्याची पारंपरिक आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.८) चंद्रेश्वरगड येथे गडाचे व्यवस्थापक स्वामी जयदेवपुरीजी महाराज व चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीने अभिषेक, महाआरती व दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य भाविक या उत्सवात सहभागी झाले होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -