घरताज्या घडामोडीपटक देंगेची भाषा करणाऱ्यांना मातोश्रीवरच यावे लागले होते, अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर

पटक देंगेची भाषा करणाऱ्यांना मातोश्रीवरच यावे लागले होते, अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर

Subscribe

शिवसेना,मुंबई महानगरपालिका आणि मुंबईकर नागरिक हे नाते अतूट आहे. कोणी कितीही वल्गना करू दया त्यात काहीच फरक पडणार नाही. पटक देंगे अशी भाषा करणारे हेच मातोश्रीच्या उंबरठयावर आले होते हे लक्षात असू दया. उपकारांची जाणीव ठेवा,असे जोरदार प्रत्युत्तर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी सोमवारी भाजपला दिले.

मुंबईची माणसे कृतज्ञ आहेत. दुष्काळ असतानाही मुंबईकरांना पाणी मिळत होते ते उद्धव ठाकरे यांनी खास धरण बांधून घेतल्यामुळेच. आरोग्य व्यवस्था देखील सुपर स्पेशालिटी दर्जाची मिळते. कोरोना काळात हे सिद्ध झाले. गुजरातमध्ये माणसे मरत होती. गंगा नदीत प्रेते टाकण्यात येत होती. मात्र मुंबईकरांना चांगली आरोग्यव्यवस्था मिळाली. मुंबईकर कधी हे विसरणार नाहीत. मुंबईकर कोणाच्या बोलण्याला भूलथापांना बळी पडणारे नाहीत. ओठात एक,पोटात एक अशी पद्धत कोणाकडे आहे हे सगळयांना माहिती आहे, असे सावंत म्हणाले.

- Advertisement -

सत्तेच्या समसमान वाटपाबाबत उद्धव ठाकरे हे तर मुख्यमंत्री असताना विधानसभेत बोलले आहेत. तेव्हा का तुम्ही तुमची भूमिका मांडली नाहीत. पटक देंगेची भाषा करणा-यांना लोकसभा निवडणुकीच्या आधी मातोश्रीच्याच उंबरठयावर यावे लागले होते हे विसरून चालणार नाही. आताची शब्‍द पलटणारी भाजप आणि जुनी भाजप यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. उपकारांची जाणीव ठेवा हीच आठवण मी त्यांना यानिमित्ताने करून देईन,असेही अरविंद सावंत म्हणाले.


हेही वाचा : दिलासादायक! कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; देशात 6 हजार 809 नवे कोरोनाबाधित

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -