घरमहाराष्ट्रआषाढी वारी २०२२ : आजपासून विठुरायाचे २४ तास दर्शन होणार, पंढरपुरात जमणार...

आषाढी वारी २०२२ : आजपासून विठुरायाचे २४ तास दर्शन होणार, पंढरपुरात जमणार भक्तांचा मेळा

Subscribe

१ जुलै पासून विठुरायचं दर्शन २४ तास घेता येणार आहे. यावर्षीच्या वारीमध्ये पंढरपूरला येणाऱ्या भाविकांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यंदाची आषाढी वारी(ashadhi wari) ही खऱ्या अर्थाने आनंद वारी ठरली आहे. कारण या वेळी पायाने चालत वारी करत आहे. यंदाची आषाढी एकादशी रविवार १० जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. आषाढी वारीसाठी पंढरपुरात(pandharpur) येणाऱ्या जास्तीत जास्त भक्तगणांना विठुरायाचं दर्शन घेता यावं या साठी आजपासून म्हणजेच १ जुलै पासून विठुरायचं दर्शन २४ तास घेता येणार आहे. त्याचबरोबर आजपासून सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. या संदर्भातील माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. त्याचबरोबर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी यांचा पलंग सुद्धा बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळे आता आषाढी वारी संपेपर्यंत देव निद्रा घेणार नाहीत म्हणजेच देव झोपायला जाणार नाहीत. अशी प्रथा आहे. ही प्रथा फार जुनी आहे. या वर्षीच्या आषाढी वारी मध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तगण पंढरपूरला येणार आहेत. यावर्षीच्या वारीमध्ये पंढरपूरला येणाऱ्या भाविकांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आणखी वाचा – आषाढी वारी २०२२: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या नीरा स्नान सोहळ्याचा वारकऱ्यांनी आनंद…

- Advertisement -

आणखी वाचा – आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा का केली जाते ?

 

- Advertisement -

पदस्पर्श आणि देवाच्या मुख दर्शनाचा लाभ भक्तांना घेता यावा यासाठी देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. सोबतच आज पासून २४ तास दर्शनाची व्यवस्था सुद्धा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान मागच्या दोन वर्षांपासून कोव्हीडच्या संकटामुळे आषाढी वारी(ashadhi wari) होऊ शकली नव्हती मात्र यावर्षी आषाढी वारी आनंदाने आणि उत्सहाने पार पडत आहे. वारकरी सुद्धा विठुरायाचं नाव घेत वारीत सहभागी झाले आहेत.

आणखी वाचा – एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका मांसाहार; अन्यथा…

आणखी वाचा – आषाढी एकादशीच्या दिवशी करा ‘या’ मंत्राचे पठण; होईल सर्व दुःखांचे निवारण

दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नाट्य सुरु होते. या सगळ्या घडामोडींनंतर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM eknath shinde) सपत्नीक यंदाची आषाढी एकादशीची शासकीय पूजा करतील अशी माहिती मंदिर सह समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली

आणखी वाचा – Somvati Amavasya : पितृदोष कमी करण्यासाठी सोमवती अमावास्येला करा ‘हे’ अचूक उपाय

आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येतात. जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल दर्शनाचा लाभ घेता यावा या साठी विठ्ठल दर्शन आजपासून २४ तास सुरु ठेवण्यात आले आहे. दोन वर्षांनंतर आषाढी वारी होत असल्याने पंढरपुरात(pandharpur) विक्रमी भाविक येणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. भक्तांना २४ तास विठ्ठल दर्शन होणार असल्याने एका तासाला अडीज ते तीन हजार भाविक विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकणार आहेत. त्याचबरोबर दिवसभरात लाखभर भाविक विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकणार आहेत. त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे.

 

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -