काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले…

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पादाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राज्यापाल भगसिंह कोश्यारी यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावले. मात्र, अधिवेशनाची तारीख बदलण्यात आल्याने काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

Congress spokesperson Sachin Sawant

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पादाची शपथ घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यापाल भगसिंह कोश्यारी यांनी नवनियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावले आहे. मात्र, अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे. हे अधिवेशन 2 आणि 3 जुलैला होणार ते आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते् सचिन सावंत यांची टीका – 

काँग्रेस प्रवक्ते् सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी होणार होते. ते केवळ हैदराबाद येथील भाजप राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने पुढे ढकलण्यात आले आहे. भाजपने स्वतःला सर्वशक्तिमान आणि संविधानापेक्षा अधिक शक्तिशाली समजण्यास सुरुवात केल्याचे हे लक्षण आहे, असे ही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

विधानसभा अध्यक्षांची निवड –

महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शनिवार आणि रविवारी म्हणजे 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढ ढकलण्यात आले असून हे अधिवेशन 3 आणि 4 जुलैला घेण्यात येणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.