घरभक्तीएकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका मांसाहार; अन्यथा...

एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका मांसाहार; अन्यथा…

Subscribe

एकादशीचे व्रत हे संपूर्ण दिवसाचे असते. अनेकांना संपूर्ण दिवस व्रत करता येत नाही. अश्या व्यक्तींना व्रत नाही केले तरी चालेल, मात्र त्या दिवशी या गोष्टींचे सेवन करणे टाळा

हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकदशी येते. त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते, तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते. अशाप्रकारे वर्षामध्ये एकूण २४ एकादशी येतात. यापैकीच ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीला सर्वोत्तम मानले जाते. असं म्हणतात की, एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापा पासून मुक्ति मिळून पुण्याची प्राप्ती होते. एकादशीचे व्रत पकडल्याने आयुष्यात संपन्नता येते.

निर्जला एकादशी वेळ
एकादशी प्रारंभ : 10 जून सकाळी 7 वाजून 27 मिनीटांपासून
एकादशी समाप्त : 11 जून सकाळी 5 वाजून 46 मिनीटांपर्यंत

- Advertisement -

निर्जला एकादशीला करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन

एकादशीचे व्रत हे संपूर्ण दिवसाचे असते. अनेकांना संपूर्ण दिवस व्रत करता येत नाही. अश्या व्यक्तींना व्रत नाही केले तरी चालेल, मात्र त्या दिवशी या गोष्टींचे सेवन करणे टाळा.

  • भात खाऊ नका
    शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी कधीही भात खाऊ नये. असं म्हणतात की, जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खाते. त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आर्शिवाद मिळत नाही. एकादशीच्या भात खाणं पाप मानले जाते.
  • मीठाचे सेवन करू नका
    शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी कधीही मीठ खाऊ नये, अधवा कमी प्रमाणात खावे.
  • मांसाहार करू नका
    शास्त्रानुसार, एकादशीला हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व्रत मानले जाते, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नये. सात्विक आहार घ्यावा.
  • या गोष्टींचे सेवन करू नका
    एकादशीच्या दिवशी तांदूळ, मसूर डाळ, वांगे, मूळा, कांदा , लसूण यांचे सेवन करणे टाळावे.

हेही वाचा :Vastu Tips : चुकूनही देवघरात ‘या’ दिशेला ठेवू नका दिवा, अन्यथा होईल नुकसान

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -