घरताज्या घडामोडीनाना पटोले यांच्यामुळे सरकार कोसळले, निलंबनानंतरही आशिष देशमुखांचा गंभीर आरोप

नाना पटोले यांच्यामुळे सरकार कोसळले, निलंबनानंतरही आशिष देशमुखांचा गंभीर आरोप

Subscribe

काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. तसेच त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

आशिष देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर नाना पटोले यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. मी जी काही भूमिका घेतली आहे ती काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या हितासाठीच घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सभेला अनुपस्थिती आणि नागपूर सभेला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी खोडा टाकला, असं आशिष देशमुख म्हणाले.

- Advertisement -

मी शिस्तपालन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही.  नाना पटोले यांच्यामुळे सरकार कोसळले आहे, जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी, अशी मागणी करत आशिष देशमुख यांनी पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष असताना तडकाफडकी राजीनामा दिला, तेंव्हापासूनच संशयाची सुई नाना पटोले यांच्यावर आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला.

- Advertisement -

काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची बैठक मुंबईत पार पडली. काँग्रेस पक्षाच्या या बैठकीत उल्हास पवार, भालचंद्र मुणगेकर आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. मात्र, आता अपेक्षेनुसार त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


हेही वाचा : काँग्रेसमधून आशिष देशमुखांचं निलंबन, कारणे दाखवा नोटीस बजावली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -