घरताज्या घडामोडीनवाब मलिकांसह ज्यांच्यावर आरोप झाले त्यांची नार्को टेस्ट करावी, आशिष शेलारांची मागणी

नवाब मलिकांसह ज्यांच्यावर आरोप झाले त्यांची नार्को टेस्ट करावी, आशिष शेलारांची मागणी

Subscribe

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेते भाजपवर आरोप करत आहेत. मंत्र्यांचे बॉम्ब फुसके निघाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहेत. पण हा बॉम्ब फुटण्यापुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक न फुटलेल्या बॉम्बच्या आवाजाने घाबरले आहेत. नवाब मलिकांनी आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्या सगळ्यांचे नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरुन यातील दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि खर काय ते समोर येईल असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान नवाब मलिकांवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या मंत्र्याचे फुसके बॉम्ब ऐकतो आहोत. त्यामध्ये आजचे वक्तव्य, त्याचं वर्णन एवढेच करणार की दिवाळीनंतर देवेंद्र फडणवीस जो बॉम्ब फोडणार आहेत तो बॉम्ब फुटण्याआधीच न फुटलेल्या बॉम्बच्या आवाजाला घाबरुन त्यांनी कानावर हात कसे ठेवले, त्याचे चित्र, आज त्यांचा बदलेला आवाज, संवाद आणि चेहऱ्यावरुन स्पष्ट झाले आहे. पण बॉम्ब हा फुटणारच सत्याला कशाचीही भीती असण्याची गरज नाही. असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मलिकांनी गुन्हेगारी लपवण्याची शपथ घेतली होती का?

जर संशयास्पद गोष्ट सापडली तर एनसीबीने कारवाई केली पाहिजे. अशी आमची मागणी आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून म्हणजे आर्यन खानला अटक झाल्यानंतर ज्या माहिती समोर येत आहेत. त्यातील बहुतांश माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक देत आहेत. यातील माहिती आर्यनच्या अटकेनंतरच्या गोष्टी नाहीत तर सर्वसाधारण गोष्टी आहेत. मग ते मलिकांनी सांगितलेले समीर वानखेडे यांचे बुट, कपडे, शर्ट याबाबत आम्हाला काही भाष्य करायचे नाही. कोणाच्याही चारित्र्याला आम्हाला प्रमाणपत्र द्यायचे नाही. आर्मी, हप्ता वसुली सारखी माहिती तुमच्याकडे होती तर ती गुप्त का ठेवली. राज्यपाल महोदयांसमोर काय शपथ घेतली. गुन्हे आणि गुन्हेगाराला लपवण्याची शपथ तुम्ही घेतली होती का? काल जन्माला आलेल्या माहितीच्या आधारावर पत्रकार परिषद घेतली नव्हती. हे आरोप ८ महिने लपवण्याचे कारण काय? याचे उत्तर मंत्री नवाब मलिकांनी दिलं पाहिजे. त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग झाला आहे का? हे राज्यपालांनी तपासले पाहिजे अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

दोघांची नार्को टेस्ट करा

नवाब मलिक यांनी दिलेली माहिती लपवणे आणि अधिकची माहिती असणे याची शक्यता आहे. त्यामुळे नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर आरोप केलेत त्या दोघांचीही नार्को टेस्ट करावी दूध का दूध पाणी का पाणी करायला हवे असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मोजमाप करुन कारवाई आम्हाला मान्य नाही

समीर वानखेडेंना चारित्र्याचे प्रमाणपत्र देणं हे भाजपचे काम नाही. एनसीबीने ड्रग्जविरोधात बीनतोड कारवाई केली पाहिजे. यामध्ये कोणाचाहील मुलाहिजा ठेवण्याची गरज नाही हीच मागणी आहे. त्यामुळे भरकटवण्याचा प्रयत्न केला तरी जिथे २ ग्राम असो किंवा पॉइंट २०० ग्राम असो, चरस, गांजा, त्यांच्या भाषेतीर हर्बल तंबाकू असो जर कायद्यात गुन्हा असेल तर त्याचे मोजमाप किती आहे यावर कारवाई ठरत असेल तर तो कायदा आम्हाला मान्य नाही.


हेही वाचा : समीर वानखेडे ७० हजाराचा शर्ट तर अडीच लाखांचे बूट वापरतात, नवाब मलिकांचा नवा खुलासा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -