संजय राऊतांसाठी अनुशासनची ऐशी की तैशी करु, आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

ashish shelar slams shivsena sanjay raut over babri demolished
फडणवीस धर्माच्या रस्त्यावर चालल्यामुळे शिवसेनेकडे अधर्म, आशिष शेलारांचा घणाघात

भाजप आमदार आशिष शेलारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरेंसाठी भाजपनं अनुशासन पाळलं आहे परंतु संजय राऊत यांच्यासाठी अनुशासन पाळणार नाही. ऐशी की तैशी करु असा इशारा भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे. बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन आशिष शेलार यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. शिवसेना, राम मंदिर बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर अदखलपात्र आहे. हेच सत्य आहे असेही आशिष शेलार म्हणाले आहेत.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. आशिष शेलार म्हणाले की, मला शिवसेनेला प्रश्न विचारायचा आहे. बाबरी मशिद पाडल्यावेळी कोण कुठे होते तर सांगा तुमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे होते, मनोहर जोशी यांचे विमान कुठे भरकटले होते, ते बाबरी पाडली तेव्हा पोहोचले की, नंतर पोहोचले, ढाचा तुटल्यानंतर का पोहोचले? यामुळे असे धंदे करु नका, अयोध्येतील पोलीस ठाण्यात तुमच्याविरोधात एनसी जरी असेल तर दाखवा, तुम्ही अदखलपात्र आहात. मिस्टर संजय राऊत तुम्ही अदखलपात्र आहात. या भानगडीमध्ये पडू नका तुमचे तोंड काळे होईल असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

बाबरी पाडली तेव्हा फडणवीस होते, कारसेवक होते, भाजपचे कार्यकर्ते होते. विटांचे पुजन केले तेव्हा तुम्ही कुठे होता. शिवसेनेचे नेते कुठे होते. त्यावेळी गंगा पुजन केले तेव्हा तुम्ही गोधड्या ओल्या करत कुठे होता. विपर्यासावर लोकांना भ्रमित करता येते हा तुमचा गैरसमज आहे. कल्याण सिंह यांनी राममंदिरासाठी स्वतःचे सरकार नचावर केले. कल्याण सिंहांच्या परिवाराकडे यांनी ट्युशन लावले पाहिजे. तुम्ही देव धर्म आणि देशासाठी पहिले मंदिरा आणि नतंर सरकार म्हणून पलटी मारली, बेडूक उड्या मारणाऱ्या शिवसेनेचे संजय राऊत हे नवीन नेतृत्व आहे. देव देश धर्म कुठे गेला. पहिले मंदिर नंतर सरकार कुठे गेले. हिंमत असेल तर कल्याण सिंह यांच्यासारखे सरकार नचावर करा आणि बाहेर पडा.

विपर्यासावर लोकांना भ्रमित करता येते हा तुमचा गैरसमज आहे. आजपर्यंत बाळासाहेबांकडे असलेला सन्मान आणि हिंदुत्वाची आवश्यकता म्हणून आम्ही अनुशासन पाळलं, संजय राऊत यांच्यासाठी अनुशासन पाळणार नाही. संयमाची ऐशी की तैशी असे आमदार शेलार यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा आजचा कार्यक्रम आयत्या बिळावर नागोबा असा आहे. कुठेही काय झाले तर आमच्यामुळे झालं याला आयत्या बिळावर नागोबा असे म्हणतात.


हेही वाचा : राज ठाकरेंना दुरूनच ईद मुबारक, शिरकुर्मासाठी बोलवण्याच्या लायकीचे राहिले नाही, इम्तियाज जलील यांचा निशाणा