ठाकरे सरकारकडून बिल्डरांना घसघशीत सूट अन् शेतकऱ्यांची लूट, आशिष शेलारांचा हल्लाबोल

सरकारचे निर्णय धनाड्यांसाठी सामान्य गरीब आणि मजूरांसाठी द्यायलाय सरकारकडे काही नाही हा चिंतेचा विषय आहे. असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत घोषणा करण्यात येत नाही. परंतु बिल्डर आणि मध्य विक्रेत्यांना राज्य सरकारकडून सवलती देण्यात येत आहेत. यामुळे ठाकरे सरकारकडून बिल्डरांना घसघशीत सूट देण्यात येत आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांची लूट करण्यात येत असल्याची खोचक टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. सोन पिकवणाऱ्या शेतककऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. परंतु ठाकरे सरकार धनाड्यांसाठी सवलती देत आहे. महाविकास आघाडी सरकार हे धनाड्यांचे सरकार असल्याची टीका आशिष शेलारंनी केली आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, या राज्य सरकारच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी परिस्थिती आहे. आज पुन्हा एकदा आपल्या बिल्डर मित्रांना भरायला लागणाऱ्या प्रिमीयममध्ये ५० टक्क्याची सूट जी १४ हजार कोटींची दिली होती.ती पुन्हा १५ दिवस वाढवली आणि पुन्हा त्यांना मदतीचा निर्णय घेतला आहे.

बिल्डरांना सूट देताय, वायनरीला खैरात वाटत आहात, विदेशी अबकारी कर कमी केला, पब, बार डिस्को आणि रेस्टॉरंटची लायसन्ससाठी फी कमी करत आहात. हे सगळं ठिक आहे पण शेतकऱ्यांची अवस्था अशी का करत आहात. ज्या शेतकऱ्यांनी मातीत सोन पिकवलं आहे त्यांची अवकाळी पावसामुळे परिस्थिती अशी झाली आहे की, २ लाख हेक्टरवर शेतजमीन नापीक झाली आहे. नुकसान झालं आहे. त्याच्यासाठी पंचनामे आणि पब, डीस्को दारुवाल्यांना थेट मदत आहे. म्हणून या सरकारची प्राथमिकता ही शेतकरी विरोधी आहे. सरकारचे निर्णय धनाड्यांसाठी सामान्य गरीब आणि मजूरांसाठी द्यायलाय सरकारकडे काही नाही हा चिंतेचा विषय आहे. असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

शिवसेनेचा आणि गोव्याचा संबंध काय – आशिष शेलार

आशिष शेलार यांनी शिवसेनेवरसुद्दा टीकास्त्र डागलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे आजकाल बोलण्यावर विचारांचे अधिष्ठानच राहिले नाही अशा प्रकारची दुर्दैवी परिस्थिती आहे. त्यावर आता कोणी गांभीर्याने घेत नाही. गेल्या ३ झालेल्या निवडणुकांची आणि शिवसेनेच्या मतांची टोटल केली तर तीन निवडणुकांमध्ये मिळालेली मत पकडून त्यांचे डिपॉझिट वाचवू शकले नाही. त्यामुळे जे स्वतःचे डिपॉझिट वाचवू शकले नाही. ते तीनवेळा जिंकणाऱ्या भाजपवर बोलत आहेत. याचा अर्थ सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.


हेही वाचा : TET मार्फत भरती झालेल्या शिक्षकांची प्रमाणपत्र पडताळणार, राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांची माहिती