घरताज्या घडामोडीMajor Accident : टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू,...

Major Accident : टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 5 जण जखमी

Subscribe

कारचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्क्दायक घटना अमरावतीत घडली. अकोल्याहून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

कारचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्क्दायक घटना अमरावतीत घडली. अकोल्याहून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघात तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (major accident in amravati three dead five seriously injured in car)

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याहून अमरावतीला एक कार निघाली होती. त्यावेळी भातकुली गावाच्या परिसरात ही कार पोहोचली असता या कारचा टायर फुटला. त्यामुळे हा अपघात झाला. परिणामी, वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी जखमींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं अमरावतीमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, ज्या कारचा अपघात झाला. त्या कारमध्ये एकच कुटंब असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, या एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कलीम खान सलीम खान (36), सलीम खान मेहमूद खान (65) आणि रुबीना परविन कलीम खान (32) असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर रिजवान, नदीम, जारा परवीन ही तीन मुलं आणि मोहम्मद शकील हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशात जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीहून ही बस मेळघाटमार्गे मध्य प्रदेशला जात होती. या बसमधून 25 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघातात दोन महिला आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत, तर यांतील पाच जण गंभीर जखमी आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – POLITICS: सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता…; किरण मानेंची पोस्ट व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -