घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरअब्दुल सत्तारांच्या 'त्या' आदेशाला औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती, कोणताही हस्तक्षेप न करण्याच्या सूचना

अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ आदेशाला औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती, कोणताही हस्तक्षेप न करण्याच्या सूचना

Subscribe

औरंगाबाद – खंडपीठाने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या महसूल मंत्री असतानाच्या एका आदेशाला स्थगिती दिली आहे. बाजार समितीच्या जागेचे व्यवहार प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर न्यायालयाने व्यवहाराला मान्याता दिली होती. मात्र, तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अर्जावर व्यवहाराला स्थगिती दिली. यावेळी त्यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशाच्या विरोधात संबंधित लोक न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने अब्दुल सत्तारांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

कृउबा समितीच्या मालकीच्या सर्व्हे नं 9233 जागेच्या व्यवहारासंदर्भात डॉ. दिलावर मिर्झा बेग यांनी तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे एक तक्रार अर्ज  दिला होता. त्यावर मंत्रालयातील संबंधित कक्ष अधिकाऱ्याने चौकशीचे आणि प्रशासक मंडळ आणि संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. चौकशीसाठी एक समिती गठित करण्यात आली होती. या आदेशाविरुद्ध तत्कालीन मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे आणि इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

- Advertisement -

हस्तक्षेप न करण्याचे आदेश –

यावर आदेश देतांना खंडपीठाने तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने कृउबा समितीच्या जिन्सी येथील जागेबाबत झालेल्या व्यवहाराच्या चौकशीच्या आदेशाला स्थगिती दिली. मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह डॉ. दिलावर बेग यांनाही नोटीस बजावण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणात अब्दुल सत्तार यांनी कोणताही हस्तक्षेप करू नये असे आदेश कोर्टाने दिले आहे.

- Advertisement -

 …सीलबंद अहवाल दाखल करा –

डॉ. दिलावर मिर्झा बेग यांनी औरंगाबाद बाजार समितीच्या जिन्सी येथील जागेच्या व्यवहारांबाबत विद्यमान कृषी आणि तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे किती तक्रार अर्ज केले, याची चौकशी करून त्याचा सीलबंद अहवाल दाखल करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्या. अरुण पेडणेकर यांनी दिले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -