घरमहाराष्ट्रBacchu Kadu : ज्यांनी भाजपाचे कार्यालय फोडले, त्यांनाच उमेदवारी ही लाचारी, बच्चू...

Bacchu Kadu : ज्यांनी भाजपाचे कार्यालय फोडले, त्यांनाच उमेदवारी ही लाचारी, बच्चू कडूंचा भाजपाला टोला

Subscribe

कोणाच्याही विरोधाला न जुमानता भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू संतापले आहेत. याचवरून आता बच्चू कडू यांनी भाजपाला खडेबोल सुनावले आहेत.

अमरावती : नवनीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात अल्याने महायुतीत मात्र, वादाची ठिणगी पडली आहे. कारण राणा यांच्या उमेदवारीला महायुतीत शिवसेना आणि प्रहार संघटनेकडून विरोध करण्यात आला होता. त्याशिवाय अमरावतीतील भाजपा पदाधिकाऱ्यांनीच राणा यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. परंतु, कोणाच्याही विरोधाला न जुमानता भाजपाने राणा यांच्या नावाची घोषणा केल्याने शिवसेना (शिंदे गट) नेते आनंदराव अडसूळ, प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू व भाजपाचे पदाधिकारी संतापले आहेत. याचवरून आता बच्चू कडू यांनी भाजपाला खडेबोल सुनावले आहेत. तर ज्यांनी भाजपाचे कार्यालय फोडले, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मारले, अशा व्यक्तीच्या घरात भाजपाकडून उमेदवारी देण्यात येणे, ही लाचारी असल्याचे म्हणत आमदार कडू यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. (Bacchu Kadu targeted BJP by giving nomination to Navneet Rana)

हेही वाचा… Navneet Rana : उमेदवारीसाठी स्वतःच्याच पक्षाचा राजीनामा देत नवनीत राणा भाजपात

- Advertisement -

एका मराठी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, भाजपाचे झेंडे ज्यांनी हाती घेतले. ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली. ज्यांच्या अंगावर पक्षासाठी गुन्हे आहेत. राम मंदिरासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांचा विचार करणे भाजपाने सोडून दिले आहे. आमदार रवी राणा यांनी भाजपाचे कार्यालय फोडले होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांना कार्यालयात घुसून मारले होते. पण आता भाजपावर अशी दुर्दैवी वेळ आली आहे की त्यांना नवनीत राणांना उमेदवारी द्यावी लागत आहे, असा टोला आमदार बच्चू कडू यांनी लगावला आहे.

ज्या रवी राणा यांनी भाजपाचे अमरावतीतील कार्यालय फोडले, त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आता रवी राणा यांचा जयजयकार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे जे काही घडत आहे, त्यामुळे स्वाभिमान गेला. अभिमानही गेला आणि संविधान तर यांनी बुडवलेच आहे. पण छत्रपतींचा स्वाभिमानही या लोकांनी गहाण ठेवलेला आहे. त्यामुळे हाच मुद्दा घेऊन याविरोधात लोकसभेच्या निवडणुकीत जबरदस्त ताकद उभी करू, असे आमदार बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

तसेच, अमरावती लोकसभेचे चित्र अतिशय स्पष्ट असून अमरावतीकरांच्या विजयाचेच ते चित्र राहिल. हा जिल्हा पंजाबराव देशमुख, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांचा आहे. त्यामुळे त्याचा अभिमान आम्ही निश्चितच ठेऊ. पण उटसूट अपमानित करणे, विकास सोडून त्याचे श्रेय घेण्याचे काम करणाऱ्यांच्या विरोधात आता नवी ताकद उभी करण्यात येईल, असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी भाजपाने नवनीत राणा यांना दिलेल्या उमेदवारीचा कडाडून विरोध केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -