घरक्राइमAir India : दारू पिऊन उडवले विमान; एअर इंडियाने केले वैमानिकाला निलंबित

Air India : दारू पिऊन उडवले विमान; एअर इंडियाने केले वैमानिकाला निलंबित

Subscribe

नवी दिल्ली : दारू पिऊन विमान उडवल्याची धक्कादायक घटना दिल्ली विमानतळावर समोर आली आहे. दारू पिऊन विमान उडवणाऱ्या वैमानिकाला अटक करण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून एअर इंडियाने हे कृत्य करणाऱ्या पायलटला निलंबित केले आहे.

कॅप्टन म्हणून एका वैमानिकाची चाचणी सुरू होती. मात्र, विमान उड्डाणापूर्वी या वैमानिकाने मद्य प्राशन केल्याचे लक्षात आले. यामुळे केबिन क्रूची चांगलीच धावपळ उडाली. विमान दिल्ली विमानतळावर उतरताच वैमानिकाला अटक करण्यात आली. या दारूड्या वैमानिकावर एअर इंडियाने कठोर कारवाई करत त्याला निलंबित केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha Election 2024: भाजपकडून प्रभारींची घोषणा; महाराष्ट्रासाठी तिघांची नावं, तर ओपी धनखर दिल्लीचे प्रभारी

काय आहे प्रकरण?

कॅप्टनपदासाठी हा वैमानिक प्रशिक्षण विमान उडवत होता. देशांतर्गत उड्डाणे करणाऱ्या पायलट आणि केबिन क्रू यांना उड्डाण करण्यापूर्वी बीए (ब्रेथ ॲनालायझर) चाचणी देणे आवश्यक आहे. ही चाचणी देत असतांना चक्क वैमानिकाने दारू पिऊन विमान उडवले. या वैमानिकाने परदेशातून भारतात विमान आणत असतांना दारू प्यायली होती. यामुळे एअर इंडियाने कडक कारवाई करत पायलटला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

- Advertisement -

दारू पिऊन परदेशातून भारतात विमान आणल्यावर दिल्ली विमानतळावर वैमानिकाची ब्रेथ ॲनालायझर चाचणी झाली. यात वैमानिक दारू प्यायल्याने निष्पन्न झाले. याप्रकरणी कंपनी या वैमानिकाविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल करणार आहे. फुकेत-दिल्ली विमान गेल्या आठवड्यात दिल्लीत उतरल्यानंतर क्रू मेंबरची ब्रेथ ॲनालायझर चाचणी करण्यात आली होती.

हेही वाचा – SRH vs MI:… म्हणून आम्ही हरलो; मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवावर हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया

या घटनेवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रतिक्रिया दिली आहे. “अशा गोष्टी आम्ही अजिबात सहन करत नाही आणि या पुढेही करणार नाही. या प्रकरणी आम्ही कठोर कारवाई करणार असून वैमानिकाची नोकरी आणि विमान उड्डाणाचा परवाना देखील काढून घेतला जाणार आहे. तसेच त्याच्याविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात येणार आहे. मद्यधुंद अवस्थेत उड्डाण करणे हा फौजदारी गुन्हा आहे”, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -