आम्ही कोणाच्या गोठ्यात बांधलेल्या गायी किंवा दावणीला बांधलेले आमदार नाही, हितेंद्र ठाकूरांचे राऊतांना प्रत्युत्तर

हितेंद्र ठाकूर म्हणाले की, गेल्या राज्यसभा विधानसभा आणि त्यानंतर सत्तांतर याबाबत ज्याप्रकारची चर्चा अख्या महाराष्ट्रात झाली, ती फार चांगली आहे. कोणीही म्हणणार नाही

bahujan vikas aghadi mla hitendra thakur criticize sanjay raut shiv sena maharashtra vidhansabha

आज महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने बहुमत परीक्षा जिंकली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री जुन्या जिल्ह्याचे एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्ही कोणाच्या गोठ्यात बांधलेल्या गायी किंवा कोणाच्या दावणीला बांधलेले आमदार नाही अशा शब्दात आमदार हितेंद्र ठाकूरांचे संजय राऊतांना आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.

हितेंद्र ठाकूर म्हणाले की, गेल्या राज्यसभा, विधानपरिषद आणि त्यानंतर सत्तांतर याबाबत ज्याप्रकारची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात झाली, ती फार चांगली आहे असं कोणीही म्हणणार नाही. कोणी कोणावर तरी बोट दाखवली गेली. कशा करता का? काही कळल नाही. जी कोण बोट दाखवणारी मंडळी असतील त्यांचे काही आक्षेप असतील, वेगवेगळ्या माध्यमातून आले वेगवेगळ्या लोकांवर बोट दाखवली गेली. कोणाची नाव घेतली. नाव घेणाऱ्यांमध्ये आमच्या पक्षातील आमदारांची नावं देखील घेतली गेली. आम्ही कोणाच्या गोठ्यात बांधलेल्या गायी किंवा कोणाच्या दावणीला बांधलेले आमदार नाहीत. आमचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष आम्ही आमच्या पद्धतीने चालवतो. आमचे शब्द आमच्या पद्धतीने देतो. टीव्हीवरील माध्यमामधून जी बदनामी करायची ती काही मंडळींनी केली. अशा शब्दात ठाकूरांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे.


आम्ही महाविकास आघाडीसोबतच; उशिराने पोहोचलेल्या अशोक चव्हाणांकडून खुलासा